रामायणातील 'रामसेतू' हा मानवनिर्मितच ; अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा

रामायणातला रामसेतू हा मानवनिर्मितच असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. विज्ञानविषयक कार्यक्रम तयार करणाऱ्या अमेरिकेच्या सायन्स चॅनेलच्या शास्त्रज्ञांनी आणि पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी यासंबंधीचं आणखी एक संशोधन समोर आणलंय.

Chandrakant Funde | Updated On: Dec 13, 2017 06:12 PM IST

रामायणातील 'रामसेतू' हा मानवनिर्मितच ; अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा

13 डिसेंबर, नवी दिल्ली : रामायणातला रामसेतू हा मानवनिर्मितच असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. विज्ञानविषयक कार्यक्रम तयार करणाऱ्या अमेरिकेच्या सायन्स चॅनेलच्या शास्त्रज्ञांनी आणि पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी यासंबंधीचं आणखी एक संशोधन समोर आणलंय. या संशोधनात पुरातत्व विभाग आणि भूगर्भ शास्त्रज्ञांनी उपग्रहानं घेतलेले फोटो, तिथली माती आणि दगडांचा अभ्यास करून हे नवं संशोधन मांडलंय. त्यानुसार भारत आणि श्रीलंकेच्यादरम्यान असलेला हा सेतू निसर्गनिर्मित नसून तो मानव निर्मित असल्याचा पुराव्यासह दावा केलाय.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 30 मैल क्षेत्रावर परसलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण इथे असलेले दगड हे सुमारे 7 हजार वर्षे तर वाळू 4 हजार वर्षे जुनी आहे. हा रामसेतू बांधण्यासाठी आणलेले दगड हे बाहेरून आणले असावेत, त्यामुळे रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नाहीय, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

हिंदू धर्मग्रंथांनुसार श्रीरामांनी लंकेवर स्वारी करताना वानरसेनेच्या मदतीनं रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या भूमीपर्यंत दगडांचा सेतू बांधल्याचा उल्लेख आहे. समुद्रात असलेल्या या सेतूची खोली 3 फुटांपासून ते 30 फुटांपर्यंत आहे. भारतात याला रामसेतू तर जगभरात 'अॅडम्स ब्रिज' या नावानं ओळखले जातं. पण या सेतूबदद्लच्या नव्या संशोधनानं रामसेतूच्या धार्मिक दाव्याला वैज्ञानिक आधार मिळालाय. त्यामुळे समुद्रात बुडालेला हा रामसेतू रामाच्या अस्तित्वाचा पुरातत्व पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, अमेरिकन शास्त्रज्ञांनी रामसेतूबाबत सादर केलेल्या या नवीन पुराव्यांचं भाजपने स्वागत केलंय. सुप्रीम कोर्टातही आम्ही रामसेतू हा मानवनिर्मितच असल्याचं यापूर्वीच सांगितल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय.

रामसेतूबाबत शास्त्रज्ञांचा दावा -

- रामसेतू हा पूर्णपणे काल्पनिक नाही

- हिंदू धर्मग्रंथांनुसार प्रभू श्रीरामांनी असाच सेतू बनवल्याचा उल्लेख

- येथे असलेले दगड सुमारे 7 हजार वर्षे जुने

- हा सेतू नैसर्गिक नाही मानवनिर्मित

- रामसेतूवरील दगड प्राचीन आणि इतरांपेक्षा वेगळे

- रामसेतूसाठी वापरलेले दगड दुसरीकडून आणण्यात आले असावेत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close