राम मंदिराचा तिढा कोर्टाबाहेरच सुटण्याची शक्यता ! 'श्री श्री' यांचा पुढाकार

राम मंदिराचा तिढा कोर्टाबाहेरच सुटण्याची शक्यता ! 'श्री श्री' यांचा पुढाकार

राममंदिराच्या मुद्द्यावर श्री.श्री. रवीशंकर यांनी मुस्लीम धर्मगुरुंशी बंगळुरुमध्ये पुन्हा एकदा चर्चा केली. या बैठकीत काही प्रस्तांवांवर नव्याने विचार करण्यात आला. वादग्रस्त जागीच राममंदिर बांधण्याबाबत चर्चा झाली. तसंच मस्जिदसाठी वेगळी जागा देण्यावरही चर्चा झालीये.

  • Share this:

09 फेब्रुवारी, बंगळुरू : राममंदिराच्या मुद्द्यावर श्री.श्री. रवीशंकर यांनी मुस्लीम धर्मगुरुंशी बंगळुरुमध्ये पुन्हा एकदा चर्चा केली. या बैठकीत काही प्रस्तांवांवर नव्याने विचार करण्यात आला. वादग्रस्त जागीच राममंदिर बांधण्याबाबत चर्चा झाली. तसंच मस्जिदसाठी वेगळी जागा देण्यावरही चर्चा झालीये. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुखीही या बैठकीत सहभागी झाले होते. राम मंदिर- बाबरी मशिदीचा हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यात तब्बल तीन ते चार तास चर्चा झाली.

सहा सदस्यांच्या या शिष्टमंडळात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी अधिकारी मौलाना सलमान हुसैनी नदवी, उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी, तत्कालीन आयएएस अधिकारी अनीस अन्सारी, इम्रान अहमद, मौलाना वासिफ हसन वैजी, ऑब्जेक्टिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे संचालक अतहर हुसैन हे होते.

बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाढलेल्या तणावासंबंधीही चर्चा झाली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मार्चमध्ये बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक अयोध्येत होईल, अशी माहिती अतहर हुसैन यांनी दिली. 'कोणत्याही परिस्थितीत समझोता करण्याची वक्फ बोर्डाची तयारी आहे. दोन्ही पक्षकारांनी एकत्र चर्चा करण्याची गरज आहे,' असे फारुकी यांनी सांगितले. या बैठकीत बेंगळुरूतील काही संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. एकूण १६ संघटनांनी सहभाग घेतला होता. सौहार्दाने या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा श्री श्री रविशंकर यांचा उद्देश आहे. मार्चमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी या महिन्यात ते अयोध्येत जाणार आहेत, असे श्री श्रींचे प्रवक्ते गौतम यांनी सांगितले.

अयोध्या प्रकरणी तीन फॉर्म्युले :

सुब्रमण्यम स्वामी यांचा फॉर्म्युला : वादग्रस्त जागीच राम मंदिर बांधण्यात यावं. शरयू नदीच्या पलिकडे मस्जिद बांधण्यात यावी.

न्यायमूर्ती पुलक बसू यांचा फॉर्म्युला : जो हिस्सा रामलल्ला विराजमानला मिळाला आहे. त्याच जागेवर राम मंदिर बांधण्यात यावं. तर बाकी जमीन निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्डाजवळ राहावी. मुस्लीम पक्षाने 200 मीटर दूर युसूफ आराच्या जमिनीवर मस्जिद बांधावी.

हासिम अन्सारी आणि महंत ज्ञानदासचा फॉर्म्युला : वादग्रस्त जमिनीवर मंदिर आणि मस्जिद बांधण्यात यावी. दोघांमध्ये 100 फुटावर एक भिंत बांधण्यात यावी.

रविशंकर यांचा फॉर्म्युला : वादग्रस्त जागी मंदिर बांधण्यात यावं.

विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं धर्मगुरुंनी स्वतंत्रपणे अयोध्या प्रकरणात लक्ष घातल्यानं नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही आर्ट लिव्हिंगच्या श्रीश्रींनी हे प्रकरण धसास लावल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, काल झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अयोध्येतील प्रकरणाकडे आस्थेच्या नव्हे, तर जमिनीच्या वादासारखेच बघितले जाईल, असे स्पष्ट केले आहे. अयोध्येतील राममंदिर प्रकरणी पुढील सुनावणी 14 मार्चला होणार आहे.

First published: February 9, 2018, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading