नवी दिल्ली, 26 जून : यावर्षी इराकला गेलेल्या भारताच्या शिष्टमंडळाला तिथे इसवी सन पूर्व 2000 मधलं एक भित्तीचित्र पाहायला मिळालं. अयोध्या शोध संस्थानचा दावा आहे की ही प्रतिमा भगवान रामाची आहे. हे भीत्तीचित्र इराकमधल्या होरेन शेखान भागात सापडलं आहे.
या चित्रामध्ये एक राजा धनुष्याची प्रत्यंचा ताणून उभा असलेला दाखवण्यात आला आहे. त्यांच्या कंबरपट्ट्यामध्ये एक खंजीर आणि तलवारही आहे. याच प्रतिमेच्या शेजारी आणखी एक प्रतिमा आहे. ही हनुमानाची प्रतिमा असावी, असं अयोध्या शोध संस्थानचे संचालक योगेंद्र प्रताप सिंह यांचं म्हणणं आहे.
इराकचे इतिहास संशोधक काय म्हणतात?
इराकचे पुरातत्त्वज्ञ आणि इतिहास संशोधकांनी मात्र या दाव्याचा इन्कार केला आहे. हे भित्तीचित्र तिथल्या पहाडी जमातीचा प्रमुख टार्डुनीची प्रतिमा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या भित्तीचित्रात दिसणाऱ्या प्रतिमा भगवान राम आणि हनुमानाच्या असू शकत नाहीत, असाही दावा त्यांनी केला आहे.
SPECIAL REPORT दाभोलकर हत्या प्रकरणातला CBIचा सर्वात मोठा खुलासा
यावर्षी भारताचे राजदूत प्रदीप सिंह राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ इराकला गेलं होतं. अयोध्या शोध संस्थानने इराकला जाऊन हे भित्तीचित्र पाहण्याचा आग्रह धरला होता.
इराक सरकारची परवानगी
ही भित्तीचित्रं नक्की कुणाची आहेत याचं संशोधन करण्यासाठी आम्ही इराक सरकारची परवानगी मागितली आहे, असं अयोध्या शोध संस्थानचे योगेंद्र प्रताप सिंह यांनी म्हटलं आहे. इराक सरकारची परवानगी मिळाल्यानंतर हे संशोधन सुरू होईल. सिंधु नदीचं खोरं आणि मेसोपोटेमिया यांच्या संस्कृतींमधला संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही ते म्हणाले.
================================================================================================
VIDEO: मॉब लिंचिंगवर पहिल्यांदाच बोलले PM मोदी, संसदेत म्हणाले...