Sushant Case: ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रकुल प्रीत सिंहची दिल्ली हायकोर्टात धाव

Sushant Case: ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रकुल प्रीत सिंहची दिल्ली हायकोर्टात धाव

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हीचं नाव आल्यानंतर तिने आता थेट दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi high court) धाव घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात खळबळ उडाल्यानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग अँगल समोर आला. या प्रकरणात नारकोटिक्स क्राइम ब्युरोने (NCB) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला ताब्यात घेतलं आणि चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले. ड्रग्ज प्रकरणात रियाने अनेक दिग्गज कलाकारांनी नावं उघड केली आहेत. यात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हीचं नाव आल्यानंतर तिने आता थेट दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi high court) धाव घेतली आहे.

रकुल प्रीत सिंह हिनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत तिच्या विरोधात मीडिया कव्हरेजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. माध्यमांच्या बातम्यांद्वारी तिची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं तिने याचिकेमध्ये म्हटलं आहे.

'भाभीजीचे पापड खाऊन कोरोना रुग्ण बरे झाले का?' संजय राऊतांची टीका

रकुल प्रीतनं याचिकेत म्हटले आहे की, 'रिया चक्रवर्तीने चौकशीत माझं नाव घेतल्यानंतर मीडिया ट्रायल सुरू झालं आहे.त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला तिच्याविरूद्ध माध्यमांचं कव्हरेज रोखण्यासाठी निर्देशित देण्याचं आवाहन तिने कोर्टाकडे केलं आहे. ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीने तिचं आणि सारा अली खानचं नाव घेतलं अशी माहिती शूटिंगदरम्यान मला समजली. यानंतर माध्यमांमध्ये अनेक प्रकारची चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे असं तिने याचिकेमध्ये लिहलं आहे.

रकुल प्रीतच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितलं की, मीडिया रकुलला हॅक करत आहे. त्यावर रकुल हिनं थेट माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार का केली नाही? असा सवाल कोर्टाकडून विचारण्यात आला आहे.

'जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??'

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणात नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केल्यानंतर शांत असलेले बॉलीवूड कलाकार अचानक रिया चक्रवर्तीच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. रिया बरोरबरचा माध्यमांचा व्यवहार पाहून हे सर्व एकजूट झाले आहेत. नुकतेच बॉलीवूडच्या काही कलाकारांनी माध्यमांना एक खुले पत्र लिहीले आहे. यात त्यांनी स्वाक्षरी करून सुशांत सिहं राजपूत मृत्यूप्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत माध्यमांद्वारा रियाशी केल्या जाणाऱ्या वागणुकीवर आक्षेप नोंदविला आहे. यात सोनम कपूर, फरहान अख्तर, जोया अख्तर, अनुराग कश्यप या सेलेब्रिटींचा समावेश आहे.

सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला, बायोपिकमध्ये त्याची भूमिका करायची असेल तर...

Feminist Voices या एका ब्लॉगपोस्टमध्ये प्रकाशित पत्रावर दिग्दर्शक अनुराग कश्यप, गौरी शिंदे, जोया अख्तर, अभिनेत्री सोनम कपूर, रसिका दुग्गल, अमृता सुभाष, मिनी माथूर, दिया मिर्झा आणि सुमारे 2500 अन्य लोकांनी स्वाक्षरी केली आहे. त्याचप्रमाणे 60 विविध संघटनांनी या पत्राचे समर्थन केले आहे. याबरोबरच पत्रात फ्रीडा पिंटो, अलंकृता श्रीवास्तव, रीमा कागती, रूचि नारायण यांनी देखील स्वाक्षरी केली आहे. या पत्रात सेलिब्रेटींनी असे म्हटले आहे की, ‘ माध्यमांनी बातम्यांचा पाठलाग करावा, महिलांचा नव्हे.’

Published by: Renuka Dhaybar
First published: September 17, 2020, 1:45 PM IST

ताज्या बातम्या