‘इनकम टॅक्सचं तुम्हाला टेंशन असेल तर एकदा चेहऱ्याला गायीचं शेण लावा’

‘इनकम टॅक्सचं तुम्हाला टेंशन असेल तर एकदा चेहऱ्याला गायीचं शेण लावा’

इनकम टॅक्स किंवा इतर कोणत्याही प्रकाराच्या टॅक्सबद्दल तुम्ही चिंताग्रस्त असाल तर तुम्ही तोंडाला गायीचं शेण लावा. यामुळे तुमची सगळी चिंता दूर होईल.

  • Share this:

मुंबई, २१ जानेवारी २०१९- चर्चेत राहण्यासाठी काय करायला हवं हे राखी सावंतशिवाय दुसऱ्या कोणालाच चांगलं माहीत नसेल. राखी तिच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटचा उपयोग फक्त याचसाठी करते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

काही दिवसांपूर्वी राखीने आपल्या लग्नाची खोटी बातमी देऊन चर्चेत येण्याचा प्रयत्न केला होता. ही चर्चा थांबते न थांबते आता राखी एक नवीन विषय घेऊन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

राखीने हा व्हिडिओ १९ जानेवारीला शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमध्ये राखी म्हणते की, इनकम टॅक्स किंवा इतर कोणत्याही प्रकाराच्या टॅक्सबद्दल तुम्ही चिंताग्रस्त असाल तर तुम्ही तोंडाला गायीचं शेण लावा. यामुळे तुमची सगळी चिंता दूर होईल.

या व्हिडिओमध्ये राखीने तिच्या डॉक्टरांची ओळख करून दिली आणि डॉक्टरांनीच हा सल्ला दिल्याचं तिनं सांगितलं. राखीचा या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या.

काही लोकांनी तिच्या डॉक्टरांना पुर्णपणे वेडा म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘स्वतःच्या या चित्र- विचित्र व्हिडिओमुळे तुलाही एकदिवस दिपक कलालसारखं मारतील.’

काही दिवसांपूर्वी दिपकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात एक व्यक्ती दिपक कलालला मारताना दिसत आहे. तर घाबरलेला दिपक त्याची माफी मागताना दिसत आहे.

VIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री

First published: January 21, 2019, 12:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading