News18 Lokmat

राजू शेट्टींचा महाआघाडीला रामराम, लोकसभा 'स्वाभिमानी' लढणार?

येत्या चार पाच दिवसांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीत याबद्दल राजू शेट्टी निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 11:37 PM IST

राजू शेट्टींचा महाआघाडीला रामराम, लोकसभा 'स्वाभिमानी' लढणार?

11 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी 'एकला चलो रे' चा नारा देण्याची शक्यता आहे. महाआघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे राजू शेट्टी स्वबळावर लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहे.

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्यभरात वेगवेगळी आंदोलन करून सरकारला जेरीस आणलं. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी महाआघाडीची वाट निवडली.

गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावरून महाआघाडीशी चर्चा सुरू झाली. काँग्रेस राष्ट्रवादीने स्वाभिमानीला सहा जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील तीन जागांवर शेट्टी ठाम होते. हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या जागा शेट्टींनी मागितल्या होत्या.

बुलढाणा जागा रविकांत तुपकर आणि वर्ध्यात माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी जागा हवी होती. परंतु,यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

त्यामुळे राजू शेट्टींनी  सात ते नऊ जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या चार पाच दिवसांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीत याबद्दल राजू शेट्टी निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे.

Loading...


===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 11:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...