पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, राजू शेट्टी पवारांच्या भेटीला!

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, राजू शेट्टी पवारांच्या भेटीला!

विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या विरोधात एकेकाळी शेट्टी यांची शेतकरी संघटना बारामतीत आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रात संघर्ष करत होती.

  • Share this:

बारामती, 16 जून : राजकारणामध्ये काहीही घडू शकते, हे आज पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले आहे.  पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. पण, आता खुद्द राजू शेट्टी हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार बाळाराम पाटील, आमदार दत्तात्रय सावंत, प्रमोदकाका काकडे आदी उपस्थित होते.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी राजू शेट्टी यांच नाव चर्चेत आहे. त्यातच खुद्द राजू शेट्टी हे पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये  राज्यपाल नियुक्त जागेसाठी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा -फडणवीसांना बसणार मोठा धक्का, महाविकास आघाडीने घेतला महत्त्वाचा निर्णय

विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या विरोधात एकेकाळी शेट्टी यांची शेतकरी संघटना बारामतीत आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रात संघर्ष करत होती. एवढंच नाहीतर राजू शेट्टी यांनी बारामतीत ही पवारांचा विरोधात आंदोलनं केली होती. पण आज राजू शेट्टी हे पवारांच्या भेटीसाठी आल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांनी भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर त्यांचे भाजपाशी संबंध बिघडले. त्यांनी मोदी-भाजपावर टीकेचा प्रहार सुरू केला. तेव्हापासून ते काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकले होते. लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपयश आले. लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह महाविकास आघाडीकडे धरला होता. त्यामुळे आता खुद्द शरद पवारांनीच राजू शेट्टींना विधान परिषदेची ऑफर दिली आहे.

हेही वाचा - आता हद्द झाली! कोरोनाचा प्रकोप टाळण्यासाठी लोक नदीत टाकताहेत रोज 500 किलो बर्फ

 

दरम्यान, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी यांच्यात चांगलीच चुरस रंगली आहे. विधानपरिषद उमेदवारी मिळावी म्हणून अनेक महिला पदाधिकारी इच्छुक आहे. राज्यपाल नियुक्त 10 जागा रिक्त झाल्या आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी एक जागा महिला प्रतिनिधींना मिळेल हे निश्चित मानलं जातं आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 16, 2020, 5:25 PM IST

ताज्या बातम्या