अवैध धंदे करणारे 2 नंबरचे मंत्री चंद्रकात पाटील, राजू शेट्टींचा घणाघात

अवैध धंदे करणारे 2 नंबरचे मंत्री चंद्रकात पाटील, राजू शेट्टींचा घणाघात

'चंद्रकांत दादांनी बिंदू चौकात यावं आणि चर्चा करावी. मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं' अशी टीक करत राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 01 एप्रिल : 'महाआघाडी 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार' असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. तर यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्ध्यातल्या सभेवरही टीका केली आहे. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. त्यासाठी आता प्रचाराच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीकेची जोड उठवली.

'चंद्रकांत दादांनी बिंदू चौकात यावं आणि चर्चा करावी. मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं' अशी टीक करत राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे. इतकंच नाही तर अवैध धंदे करणारे 2 नंबरचे मंत्री चंद्रकात पाटील आहेत असा घणाघाती आरोपही त्यांनी केली.

'शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात' असा गंभीर आरोप भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्या टीकेवरही राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटीलांना प्रत्त्युतर दिलं आहे. 'चंद्रकांत दादांनी कुणाकडून किती घेतले हे मी सिद्ध करतो'

लोकसभा निवडणुक 2019

लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.

11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम

18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर

23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान

नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी

लोकसभा निवडणूक 2014

महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.

महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल

एकूण जागा 48

भाजप 23

सेना 18

राष्ट्रवादी काँग्रेस 4

काँग्रेस 2

स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1

First Published: Apr 1, 2019 02:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading