सदाभाऊंनीच शेतकऱ्यांचा संप फोडला - राजू शेट्टी

खदाभाऊंना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांना सामोरं जाव लागेलच पण त्याचबरोबर, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सदाभाऊंवर कारवाई करणार असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2017 07:29 PM IST

सदाभाऊंनीच शेतकऱ्यांचा संप फोडला - राजू शेट्टी

04 जून : सदाभाऊंनीच शेतकऱ्यांचा संप फोडला असल्याचा थेट आरोप खासदार राजू शेट्टींनी केला आहे. शेतकऱ्यांच्या संपामध्ये ढवळाढवळ करण्याचं काम सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. खदाभाऊंना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला त्यांना सामोरं जाव लागेलच पण त्याचबरोबर, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

कोल्हापूरमध्ये आज (रविवारी) पत्रकारांशी संवाद सादताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यभर सुरू असलेला शेतकऱ्यांचा संप नवख्या शेतकऱ्यांना घेऊन मोडीत काढण्याचा सरकारनं केलेला प्रयत्न चुकीचा असल्याचंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

तसंच, शेतकऱ्यांचं हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर नेणार असून नाशिक आणि मुंबईमध्ये यासंदर्भात बैठक घेणार, असल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवावं पण त्याला हिंसक वळण लावू नये. रण शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय. त्यामुळं दूध, भाजीपाला गरजू व्यक्तींना वाटण्याचं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2017 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...