Home /News /news /

एवढा पोलीस बंदोबस्त, अतिरेकी शिरले की काय? फडणवीसांच्या दौऱ्यावर शेट्टींचा टोला

एवढा पोलीस बंदोबस्त, अतिरेकी शिरले की काय? फडणवीसांच्या दौऱ्यावर शेट्टींचा टोला

भाजप अणि रयत संघटनेने काढलेल्या आत्मनिर्भर यात्रेचा समारोपाच्या कार्यक्रमात कडकनाथ कोंबड्या उधळू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.

सांगली, 27 डिसेंबर: भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) रविवारी इस्लामपूरच्या दौऱ्यावर आहेत. भाजप अणि रयत संघटनेने काढलेल्या आत्मनिर्भर यात्रेचा समारोप होत आहे. त्यावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी खोचक टीका केली आहे. इस्लामपूर शहरांमध्ये अतिरेकी शिरले की काय? घोटाळे बहाद्दरांसाठी पोलिस बंदोबस्त कशासाठी ? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांना टोला लगावला आहे. हेही वाचा... रेखा जरे हत्याकांड! आरोपी पत्रकाराचं आणखी एक प्रकरण आलं समोर देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात इस्लामपूरमध्ये दाखल होणार आहेत. भाजप अणि रयत संघटनेने काढलेल्या आत्मनिर्भर यात्रेचा समारोपाच्या कार्यक्रमात कडकनाथ कोंबड्या उधळू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. कडकनाथ घोटाळा देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. इस्लामपूर शहरांमध्ये अतिरेकी शिरले आहेत का? इस्लामपूर शहरात इतका मोठा पोलीस फौजफाटा कशासाठी? असा खडा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्रा रविवारी इस्लामपूर शहरात दाखल झाली. त्यामुळे इस्लामपुरात दोन्ही यात्रांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेली कडकनाथ संघर्ष यात्रा काढली रविवारी इस्लामपूरमध्ये पोहोचली. सांगली ते इस्लामपूर अशी ही संघर्ष यात्रा राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात मोटारसायकलवरून काढण्यात आली. हेही वाचा...लाडक्या कुत्र्याची बिबट्याने पकडली मान, मालकाने जीव धोक्यात घातला आणि... कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात अनेक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती. शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या उत्पन्नाचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही शेकडो शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबडी व्यवसायात मोठ्या संख्येनं कोट्यवधी रूपये गुंतवले होते. नंतर मात्र, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली होती. कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलगा सागर खोत यांचा हात आहे, असा राजू शेट्टी यांनी घणाघाती आरोप केला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या