झंडा उँचा रहे हमारा... संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची सियाचीनला भेट

संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर राजनाथ सिंह यांनी सियाचीनला भेट दिली. नव्या संरक्षणमंत्र्यांनी युद्धा स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

  • Share this:

सियाचीन ही जगातली सर्वात उंचावरची रणभूमी आहे. कोराकोरम रांगांमध्ये असलेल्या सियाचीनमध्ये जवानांना अत्यंत प्रतिकूल हवामानात सीमांचं रक्षण करावं लागतं.

संरक्षणमंत्री झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी सियाचीन आणि श्रीनगरचा दौरा केला. इथल्या सुरक्षाव्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला.

सियाचीनसारख्या प्रतिकूल हवामानात लष्कराचे जवान डोळ्यांत तेल घालून सीमेचं संरक्षण करत असतात. संरक्षणमंत्र्यांनी इथे तिरंग्याला अभिवादन केलं.

राजनाथ सिंह यांनी सियाचीनमध्ये जवान आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत या दौऱ्यात लष्करप्रमुख विपिन रावत हेही आहेत.

राजनाथ सिंह यांनी सियाचीनमध्ये जवान आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

राजनाथ सिंह यांनी सियाचीननंतर श्रीनगरलाही भेट दिली आणि तिथल्या दहशतवादविरोधी मोहिमांची माहिती घेतली.

राजनाथ सिंह यांनी युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना श्रद्धांजलीही वाहिली.

सियाचीनमध्ये दरडी आणि हिमकडे कोसळण्याच्या घटना वारंवर घडतात. इथलं तापमान शून्यापासून ते उणे 60 अंशांपर्यंतही खाली जातं.

सियाचीनमध्ये दरडी आणि हिमकडे कोसळण्याच्या घटना वारंवर घडतात. इथलं तापमान शून्यापासून ते उणे 60 अंशांपर्यंतही खाली जातं. राजनाथ सिंह यांनी अशा प्रतिकूल युद्धभूमीचा दौरा केला.

मला भारताच्या शूर जवानांचा अभिमान आहे. त्यांना इतक्या दूर रणभूमीत पाठवणाऱ्या त्यांच्या आईवडिलांबद्दलही मला अभिमान आहे, असं राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या