दिल्लीतल्या हिंसाचारावरून सुपरस्टार रजनीकांतची केंद्रावर सडकून टीका

दिल्लीतल्या हिंसाचारावरून सुपरस्टार रजनीकांतची केंद्रावर सडकून टीका

  • Share this:

चेन्नई, 26 फेब्रुवारी:दक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांतने दिल्लीतल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. दिल्लीत ज्या पद्धतीने हिंसाचार उसळला तो अतिशय दुख:द आहे. ज्या पद्धतीने हिंसक परिस्थीती निवळायला वेळ लागली ते पाहाता हे केंद्र सरकारच्या गुप्तचार विभागाचं आणि गृहमंत्रालयाचं अपयश असल्याचं रजनिकांत यांनी म्हटलं आहे. यापूर्वी सुद्धा रजनिकांत यांनी सीएए आणि एनआरसी च्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. एक प्रकारे मुस्लीम धर्मियांचा जो विरोध या दोन्ही विधेयकांना होत आहे त्याचीच बाजू रजनिकांत यांनी घेतली होती. दिल्लीतलं आदोलन शांततेत होऊ शकलं असतं. पण तसं झालं नाही. जर कोणीही हिंसचार करत असेल तर त्याचा कठोरपणे मुकाबला केला पाहीजे असंही थलायवा अर्थात सुपरस्टार रजनिकांत ने म्हटलं आहे.

LIVE Delhi Violence: इन्शा अल्लाह! यहाँ पर अमन कायम होगा- अजित डोवल

एफआयआर दाखल करण्याचे आदेश

दिल्लीच्या उच्च न्यायालयाने अखेर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना पोलिसांना कपिल मिश्रा आणि प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांवर FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तर गुरुवारी दुपारपर्यंत पोलिस आयुक्तांनी आपला लिखित जबाब नोंदवावा असे आदेश सुद्धा न्यायालयाने दिला आहेत. दोन दिवसातल्या हिंसाचारात दिल्लीमध्ये आतपर्यंत 27 जण मृत्युमुखी पडले आहेत.

ही बातमी जरूर पाहा : कोरोनाच्या विळख्यातून अखेर 'त्या' भारतीयांची सुटका; सरकारचं मोठं पाऊल

अजित डोभाल मैदानात

बुधवारी संध्याकाळी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिल्लीतल्या दंगल प्रभावित भागातून पायी दौरा केला. पोलिसांवर विश्वास ठेवा, शांतता पाळा, आपल्या भावनांना आवर घाला, आपल्या सगळ्यांना मिळून दिल्लीत शांतता राखायची आहे असं डोवल यांनी लोकांना वैयक्तिक भेटून सांगितलं. डोभाल यांनी स्वत: दंगल प्रबावित भागात अनेकांशी संवाद साधला. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही समाजाचा लोकांच्या त्यांनी भेटी घेतल्या. इन्शा अल्लाह लवकर सगळं शांत होईल अशा शब्दात त्यांनी मुस्लींम समुदायाच्या लोकांना शांततेचं आवाहन केलं. संध्याकाळी उशिरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दंगलग्रस्त भागचा दौरा केला.

First published: February 26, 2020, 10:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या