काँग्रेसच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांनीही घेतला 'हा' मोठा निर्णय

काँग्रेसच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांनीही घेतला 'हा' मोठा निर्णय

काँग्रेसने तिन्ही राज्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं सत्तेवर येताच आठवड्याभरात तिन्ही राज्यात कर्जमाफी जाहीर केली

  • Share this:


राजस्थान, 18 डिसेंबर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पाठोपाठ काँग्रेसनं दिलेलं आश्वासन पाळत राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. राजस्थान सरकारने शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे.

राजस्थानमध्ये वसुधंरा राजे यांच्या गडाला सुरूंग लावून काँग्रेसनं सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्रिपदी अशोक गहलोत यांची निवड झाली. तर उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांची निवड झाली.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असं आश्वासन दिलं होतं. अशोक गहलोत यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर गहलोत यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफ करत असल्याची घोषणा केली.राजस्थान सरकारनं शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्जमाफ केलं आहे. एकूण 18 हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्याच दिवशी शेतकऱ्यांची कोणत्याही नियम आणि अटींशिवाय सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती.

तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या दोन तासातच राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. कर्जमाफी हा त्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय होता. 61 हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली होती. त्यामुळं लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

काँग्रेसने तिन्ही राज्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं सत्तेवर येताच आठवड्याभरात तिन्ही राज्यात कर्जमाफी जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 08:32 PM IST

ताज्या बातम्या