मुंबई, 11 ऑगस्ट : राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. पण, अखेर आता सचिन पायलट यांनी माघार घेत पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या घरवापसीमागे मुंबईतील दोन नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सोमवारी संध्याकाळी काँग्रेसमध्ये अचानक घडामोडींनी वेग आला. सचिन पायलट समर्थकांनी प्रियांका गांधी यांची भेट घेतली आणि आपला प्रस्ताव मांडला. त्यानंतर सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केला. राहुल गांधी यांच्याशी चर्चेनंतर वादावर अखेर पडदा पडला. पक्षाच्या वरिष्ठांनीही तातडीने निर्णय घेत सचिन पायलट यांच्या घरवापसीला हिरवा कंदील दिला.
खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, 6 दिवसांपासून सुरू आहे कोरोनावर उपचार
सचिन पायलट यांच्या घरवापसीसाठी मुंबईतील काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुडा, भंवर जितेंद्र सिंह, मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांचा प्रयत्नाला खास यश मिळाले आहे.
सचिन पायलट यांनी एक पाऊल पुढे टाकल्यानंतर काँग्रेसमधील या युवा ब्रिगेडने मोठ्या नेत्यांची मनधरणी करण्यात यश मिळवले. ही युवा नेत्यांची आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांची टीम गुप्तपणे पायलट यांच्या संपर्कात होती.
SSR Death Case : नवे वळण, सुशांतच्या वडिलांचा रिया-श्रुतीला केलेला 'तो' मेसेज..
दीपेंद्र हुडा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहे. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी पायलट यांच्या परतीला होकार दिला. त्यानंतर हुडा आणि भंवर जितेंद्र सिंह यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांनीही तडजोडीसाठी प्रस्ताव साद केला.
विशेष म्हणजे, वेणुगोपाल आणि पी चिंदबरम यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पायलट यांच्या भूमिकेला लगेच पाठिंबा दिला. त्यामुळे आता पायलट यांच्या घरवापसीच मार्ग अखेर मोकळा झाला.
का चिंघळला होता वाद?
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांच्यासह तब्बल 22 आमदार होते. राज्य सरकारने त्यांच्यावर सरकार पाडण्याचा आरोप लावला होता. शिवाय राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. ज्यामुळे सचिन पायलट नाराज होते. त्यांच्या बंडखोरीनंतर सचिन यांना उपमुख्यमंत्री-प्रदेश अध्यक्ष पदावरुन हटविण्यात आले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप लावला होता की, सचिन पायलट भारतीय जनता पक्षासोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते. यासह अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा झाली. सचिन पायलट पुन्हा पक्षात जाण्याला हिरवा कंदील मिळाला असून येत्या काळात खरच पायलट काँग्रेसमध्ये पुन्हा जागा बनवू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.