VIDEO : दोन बैलांची थरारक झुंज, भांडता-भांडता पाणीपुरीच्या गाडीत अडकला बैल आणि...

VIDEO : दोन बैलांची थरारक झुंज, भांडता-भांडता पाणीपुरीच्या गाडीत अडकला बैल आणि...

दोन बैलांची झुंज गेली टोकाला. 20 मिनिटे पाणीपुरीच्या गाडीत अडकला होता बैल.

  • Share this:

चूरू (राजस्थान), 18 फेब्रुवारी : राजस्थानमधील जिल्हा मुख्यालयाच्या समोरचं दोन बैलांची थरारक झुंज पाहायला मिळाली. या झुंजीचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे. दोन बैलांची झुंज एवढी भयंकर होती, यातीतल एक बैल चक्क पाणीपुरीच्या गाडीतच अडकला. या बैलाला बाहेर काढण्यासाठी या गाडीचा काही भाग तोडावा लागला. सुदैवाने या झुंजी त कोणीही जखमी झाले नाही, मात्र हा थरारक प्रकार पाहण्यासाठी मात्र लोकांची गर्दी जमली होती. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

20 मिनिटे बैल अडकला होता गाडीत

ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चुरू शहरात घडली जात आहे. येथील धर्मस्तुपाजवळ दोन बैल आपसात भिडले.सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर जास्त वर्दळ नव्हती, त्यामुळं कोणीही जखमी झाले नाही. या दोन बैलांमध्ये तुफान भांडण सुरू असताना एका बैलानं आपल्यावरील हल्ला टाळण्यासाठी पाणीपुरीच्या गाडीत घुसला. मात्र त्याला या गाडीतून बाहेर काही पडता आले नाही. अखेर या बैलाला बाहेर काढण्यासाठी जवळच्या नागरिकांना मदत करावी लागली. 20 मिनिटांनंतर, गाडीचा एक भाग कापून बैलाला बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, यावेळी काही लोकांनी या बैलाचा व्हिडिओ काढला, त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला.

भटक्या प्राण्यांमुळे लोकांच्या जीवाला धोका

विशेष म्हणजे राज्यातील विविध शहरांमध्ये भटक्या प्राण्यांमुळं सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका पोहचत आहे. अनेकदा परदेशी पर्यटकही या भटक्या प्राण्यांमुळे जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. राजस्थानमधील जयपूरसह, जैसलमेर आणि शेखावतीच्या मांडवा यासारख्या प्रसिद्ध पर्यटन केंद्रांवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. असे असूनही स्थानिक प्रशासन त्यांना आळा घालण्यात अपयशी ठरते.

First published: February 18, 2020, 9:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या