भाजप खासदाराचा अजब दावा, कोरोनापासून वाचण्यासाठी चिखलात अंघोळ आणि शंख वाजवा

भाजप खासदाराचा अजब दावा, कोरोनापासून वाचण्यासाठी चिखलात अंघोळ आणि शंख वाजवा

याआधी एएका केंद्रीय मंत्र्याने कोरोनापासून दूर राहण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला दिला होता.

  • Share this:

गुरुग्राम, 16 ऑगस्ट: कोरोपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत आहे. यामध्ये सध्या जोरदार चर्चेत आहे ते म्हणजे भाजप खासदार. याचं कारणही तेवढंच खास आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अजब दावे केले जात आहेत. या दाव्यासोबतच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भाजप खासदार सुखबीरसिंह या व्हिडीओमध्ये चिखलानं अंघोळ करताना आणि शंखनाद करताना दिसत आहेत. कोरोनाची भीती बाळगू नका. नैसर्गिक गोष्टीपासून आपण खूप लांब राहातो. निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. चिखलानं अंघोळ केल्यानं आणि शंख वाजवल्यानं कोरोनाचा संसर्ग होणार नाही असाही दावा त्यांनी केला आहे. या गोष्टी केल्यानं कोरोना तुमच्यापासून दूर राहिलं असं भाजप खासदार सुखबीरसिंह म्हणतात. त्यांच्या या अजब दाव्यामुळे सध्या ते तुफान चर्चेत आहेत.

हे वाचा-नदी पार करताना घसरला पाय, क्षणार्धात पाण्याच्या प्रवाहात मुलं गायब

याआधी राजस्थानमधील केंद्रीय मंत्र्यांनी कोरोनापासून दूर राहण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता भाजप खासदार सुखबीरसिंह यांनी हा अजब दावा केला आहे. गोळ्या घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढणार नाही. त्यासाठी भरपूर खाल्लं पाहिजे, फिरलं पाहिजे, खेळलं पाहिजे, शेतात काम करायला हवं असंही ते म्हणाले.

सुखबीरसिंह जौनपुरिया हे राजस्थानमधील टोंक इथले भाजप खासदार आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या त्यांच्या या अजब दाव्याची सध्या सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा रंगली आहे. त्यांचा चिखलात अंघोळ करताना आणि शंख वाजवतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 16, 2020, 12:57 PM IST

ताज्या बातम्या