Home /News /news /

29 वर्ष खोट्या कागदपत्रांनी केली CRPF मध्ये नोकरी, निवृत्तीनंतर उघड झालं सत्य!

29 वर्ष खोट्या कागदपत्रांनी केली CRPF मध्ये नोकरी, निवृत्तीनंतर उघड झालं सत्य!

29 वर्ष खोट्या कागदपत्रांच्या (Fake Documents) आधारावर CRPF मध्ये नोकरी करणाऱ्या माणसाचं सत्य अखेर त्याच्या रिटायरमेंटनंतर उघड झाले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

    भिलवाडा, 19 डिसेंबर :  नोकरी मिळवण्यासाठी किंवा ती टिकवण्यासाठी ‘वाट्टेल ते’ करण्याची अनेकांची तयारी असते. या तयारीमधूनच अनेक गुन्हे घडतात. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कुठे तरी चुकतोच. सत्य कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी ते अखेर उघड होतंच. राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडामध्ये (Bhilwara) घडलेल्या एका प्रसंगात हा अनुभव आला आहे. भिलवाडात तब्बल 29 वर्ष खोट्या कागदपत्रांच्या (Fake Documents) आधारावर CRPF मध्ये नोकरी करणाऱ्या माणसाचं सत्य अखेर त्याच्या रिटायरमेंटनंतर उघड झाले. शिवराज मीणा असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण? भिलवाडाचा शिवराज 1987 साली CRPF मध्ये भरती झाला होता. त्याने नोकरीसाठी दिलेल्या अर्जामध्ये खोट्या वयाची कागदपत्रं दिली होती. त्यावेळी त्याचा खोटारडेपणा पचला. तो नोकरीवर रुजू झाला. थोडी थोडकी नाही तर तब्बल 29 वर्ष शिवराजनं नोकरी केली. त्यानंतर त्याने स्वेच्छा निवृत्तीसाठी (VRS) अर्ज केला आणि तो रिटायर झाला. शिवराजनं संपूर्ण नोकरी खोट्या कागदापत्राच्या आधारावर केली. शिवराज रिटायर झाल्यानंतर त्याच्या विरोधात एकानं तक्रार केली. त्या तक्रारीनंतर तपास यंत्रणांनी त्याच्या कागदपत्रांची संपूर्ण चौकशी केली. त्यानंतर हे सत्य समोर आले. शिवराजला आता जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. ‘शिवराजसारखा आणखी कोणता कर्मचारी खोट्या कागदपत्रासह CRPF मध्ये नोकरी करत आहे का?’ याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या