Assembly Election Result 2018: सचिन पायलट मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार, समर्थकांचा जल्लोष

Assembly Election Result 2018 LIVE: काँग्रेसचे सचिन पायलट जिंकणार की भाजप धक्का देणार? Rajasthan Election Results with News18 Lokmat.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 09:19 AM IST

Assembly Election Result 2018:  सचिन पायलट मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार, समर्थकांचा जल्लोष

जयपूर, 11 डिसेंबर : सचिन पायलट यांनी त्यांच्या मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. तसंच त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार चर्चा असल्याने समर्थकांध्येही जल्लोष पाहायला मिळत आहे. पायलट याांनी पहिल्या राऊंडमध्ये 2000 मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट हे टोंक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात युनूस खान यांना उमेदवारी दिली आहे. युनूस खान हे भाजपचे राजस्थानातले एकमेव मुस्लिम उमेदवार आहेत.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस यांच्यात असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात कोणत्याही एका पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता येऊ शकलेली नाही. त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की कायम राहणार, हे पाहावं लागेल.

2013 साली झालेल्या मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळवता आल्या होत्या. इतरांना 16 जागांवर यश आलं होतं.

विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच सध्याच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा होत्या, तर काँग्रेसचे नेतृत्व अनुभवी अशोक गहलोत आणि युवा नेते असलेले सचिन पायलट करत होते.

या निवडणुकीत भाजप 199 जागांवर लढतंय, तर काँग्रेसचे उमेदवार 194 जागांवर लढत आहेत. शिवाय बीएसपी 189, आम आदमी पार्टी 141, घनश्याम तिवारींची भारत वाहिनी पार्टी 80, हनुमान बेनिवालची राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी 58 जागांवर लढतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 08:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...