Assembly Election Result 2018: राजस्थानात काँग्रेसला बहुमत, वसुंधरांचं राज्य खालसा

Assembly Election Result 2018: राजस्थानात काँग्रेसला बहुमत, वसुंधरांचं राज्य खालसा

Assembly Election Result 2018 LIVE: Rajasthan विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच सध्याच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा आहेत, तर काँग्रेसचे नेतृत्व अनुभवी अशोक गहलोत आणि युवा नेते असलेले सचिन पायलट करत होते.

  • Share this:

जयपूर, 11 डिसेंबर : राजस्थानात काँग्रेस 101 तर भाजप 75 जागांवर पुढे आहे. काँग्रेसने आघाडी घेताच मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसकडून अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. राजस्थानात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे.

राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी 199 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झालं. यावेळी 72 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. रामगड या विधानसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचा मृत्यू झाल्याने या मतदारसंघातील मतदान पुढे ढकललं आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही सत्ताधारी भाजप आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस यांच्यात असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून राजस्थानात कोणत्याही एका पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता येऊ शकलेली नाही. त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की कायम राहणार, हे पाहावं लागेल.

2013 साली झालेल्या मागील निवडणुकीत भाजपने 163 जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर काँग्रेसला अवघ्या 21 जागा मिळवता आल्या होत्या. इतरांना 16 जागांवर यश आलं होतं.

विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे याच सध्याच्या निवडणुकीत भाजपचा चेहरा आहेत, तर काँग्रेसचे नेतृत्व अनुभवी अशोक गहलोत आणि युवा नेते असलेले सचिन पायलट करत होते.

या निवडणुकीत भाजप 199 जागांवर लढतंय, तर काँग्रेसचे उमेदवार 194 जागांवर लढत आहेत. शिवाय बीएसपी 189, आम आदमी पार्टी 141, घनश्याम तिवारींची भारत वाहिनी पार्टी 80, हनुमान बेनिवालची राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी 58 जागांवर लढत आहे.

VIDEO : अमित शहा घसरले...

First published: December 11, 2018, 8:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading