मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कौतुक करावं तेवढं थोडं! लॉकडाऊनमध्ये 2 चिमुकल्यांनी 2100 पानांवर लिहिलं रामायण

कौतुक करावं तेवढं थोडं! लॉकडाऊनमध्ये 2 चिमुकल्यांनी 2100 पानांवर लिहिलं रामायण

अर्चाना तिसरी तर तिचा भाऊ माधव चौथीत आहे. एवढ्या लहान वयात दोघांनी मिळून जवळपास 2100 पानांवर रामायणाची कथा लिहून पूर्ण केल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

जालौर, 10 जानेवारी : कोरोनामुऴे 2020 वर्षांतील पहिले दोन टप्पे तर संपूर्ण जग थांबल्यासारखं झालं होतं. लॉकडाऊनमुळे सगळेच घरी होते. यावेळी रिकाम्या वेळेत अनेकांनी आपली कौशल्य आणि छंद जोपासले. पण दोन मुलांची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या दोन मुलांनी 2100 पानांवर संपूर्ण रामायण लिहून काढलं आहे. या दोन मुलांची खूप चर्चा होत आहे.

दूरदर्शनवर प्रसारित होणारी रामायण ही मालिका लोकांना खूप पाहिली असेल. लॉकडाऊनदरम्यान दोन भावंडांनी मिळून ही कथा 2100 पानांवर लिहून काढली आहे. राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या माधव जोशी आणि त्याच्या बहिणीनं मिळून ह्या रामायणाच्या कथा लिहिल्या आहेत.

भाऊ आणि बहीण माधव आणि अर्चना यांनी कोरोनाच्या काळात संपूर्ण रामायण स्वत: पेन आणि पेन्सिलने लिहिले आहे. यासाठी त्यांनी 20 वह्या वापलल्या तब्बल 2100 पानांवर त्यांनी हे लिखाण लॉकडाऊनच्या काळात पूर्ण केलं आहेत.

या दोघांनी मिळून सात भागांमध्ये हे रामायण लिहिलं आहे. बाल्यावस्था, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर, लंका आणि उत्तर रामायण असा 7 भागात हे रामायण पेन आणि पेन्सिलिनं या दोघांनी 2100 पानांवर लिहिलं आहे. यामध्ये माधवनं बाल्यावस्था, अयोध्या, अरण्य आणि उत्तरकांड लिहिलं आहे तर बहीण अर्चनानं 6 भागात किष्किंधा, सुंदर, लंका लिहिलं आहे. दूरदर्शनवर रामायण पाहून ते वाचण्याची उत्सुकता आणखीन निर्माण झाली होती.

हे वाचा-भारतीय विद्यार्थ्याने जिंकलं NASA चं मून टू मार्स अ‍ॅप चॅलेंज; बनवलं हे खास App

या दोघांनी आपल्या कुटुंबियांसोबत श्रीरामचरितमानसचं तीन वेळा पठण केलं होतं. त्यानंतर रामायण वाचण्याची उत्सुकता आणखीन वाढली. त्यांनी श्रीरामचरितमानस नीट समजून घेतलं आणि त्यानंतर रामायण लिहायला घेतलं. अर्चाना तिसरी तर तिचा भाऊ माधव चौथीत आहे. एवढ्या लहान वयात दोघांनी मिळून जवळपास 2100 पानांवर रामायणाची कथा लिहून पूर्ण केल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.

First published: