राजस्थानात बस नदीत कोसळून 26 प्रवाशांचा मृत्यू !

राजस्थानात बस नदीत कोसळून 26 प्रवाशांचा मृत्यू !

राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यात बनास नदीत प्रवासी बस कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हलगर्जी आणि बेदरकारपणे बस चालवल्यामुळे ही प्रवासी बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळतेय.

  • Share this:

23 डिसेंबर, जयपूर : राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यात बनास नदीत प्रवासी बस कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हलगर्जी आणि बेदरकारपणे बस चालवल्यामुळे ही प्रवासी बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळतेय. शनिवारी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस बनास नदीवरील पुलावरुन भरधाव वेगात जात असतानाच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही भरधाव बस पुलाचे कठडे तोडून बस नदीत कोसळली.

अपघातात 26 प्रवाशांना जलसमाधी मिळालीय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन बालकांचा समावेश आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. थंडी, त्याचप्रमाणे नदी खोल असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

 

>>

First published: December 23, 2017, 10:39 AM IST

ताज्या बातम्या