मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मेडिकल टेस्टमध्ये फेल बनता आलं नाही IAS; आठ वर्षांनी नशिबानं मारला यू-टर्न; स्वप्नं झालं पूर्ण

मेडिकल टेस्टमध्ये फेल बनता आलं नाही IAS; आठ वर्षांनी नशिबानं मारला यू-टर्न; स्वप्नं झालं पूर्ण

आठ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने (Supreme court) आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून, त्याच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

आठ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने (Supreme court) आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून, त्याच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

आठ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने (Supreme court) आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून, त्याच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

  मुंबई, 16 जून:   आपण आयएएस अधिकारी (IAS officer) व्हावं असं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. यासाठी दर वर्षी कित्येक विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. कित्येक विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळत नाही, तर कित्येकांना मुलाखतीमध्ये. राजशेखर रेड्डी (Rajasekhar Reddy) नावाच्या एका व्यक्तीने 2014 साली हे दोन्ही टप्पे पार केले होते; मात्र मेडिकल टेस्टमध्ये (Medical Test) अनफिट असल्यामुळे त्याचं आयएएस होण्याचं स्वप्न भंगलं होतं; मात्र आता आठ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने (Supreme court) आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून, त्याच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. काय आहे प्रकरण? 2014 साली राजशेखर याने नागरी सेवा परीक्षेत (Civil Service Exam) यश मिळवलं होतं. हा त्याचा पाचवा आणि शेवटचा अटेम्प्ट होता. लेखी परीक्षा, मुलाखत हे टप्पे पार केल्यानंतर राजशेखरचं अंतिम यादीमध्ये नाव जाहीर करण्यात आलं होतं; मात्र मेडिकल टेस्टच्या वेळी बॉडी मास इंडेक्स (BMI) प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळे त्याचं नाव काढण्यात आलं. बॉडी मास इंडेक्स म्हणजे उंचीच्या प्रमाणात असलेलं वजन. नियमांनुसार निवड होण्यासाठी उमेदवाराचा बीएमआय 30पेक्षा कमी असावा लागतो; मात्र राजशेखरचा बीएमआय 32 होता. त्यामुळे त्याला अनफिट ठरवण्यात आलं होतं. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खूशखबर! NFSC मध्ये नोकरीची संधी; पत्त्यावर पाठवा अर्ज
  सहा महिन्यांत मिळते दुसरी संधी नागरी सेवा परीक्षेच्या नियमांनुसार, 30 पेक्षा अधिक BMI असणाऱ्या व्यक्तींना सहा महिन्यांच्या आत पुन्हा एकदा मेडिकल टेस्ट (Medical Test rule) देण्याची संधी मिळते. राजशेखर 9 मार्च 2016 रोजी मेडिकल टेस्ट देण्यासाठी गेले होते; मात्र सहा महिन्यांच्या डेडलाइननंतर आल्यामुळे त्यांची चाचणी घेण्यात आली नाही.
  सर्वोच्च न्यायालयाने दिली संधी यानंतर राजशेखरने आपल्याला एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (Supreme Court Bench) राजशेखर यांचा हा शेवटचा अटेम्प्ट होता हे लक्षात घेऊन त्यांना पुन्हा मेडिकल चाचणी करण्याची परवानगी दिली. यासाठी जस्टिस अजय रस्तोगी आणि विक्रम नाथ यांनी कलम 142 अंतर्गत असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अधिकारांचा (Supreme Court rights) वापर केला. पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; रजिस्ट्रेशनसाठी 3 दिवसांचा वेळ
  जुन्या नियमांप्रमाणे मिळणार पगार सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले, की राजशेखर यांना 2014 साली असलेल्या पे-स्केलप्रमाणे पगार देण्यात यावा. अर्थात, त्यांना 2014 पासूनचा पगार मिळणार नाही. नियुक्ती झाल्यानंतरच त्यांचा पगार सुरू होणार आहे. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अधिकारांचा वापर करून, राजशेखर यांचं आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
  First published:

  Tags: Career opportunities, Ias officer, Success stories

  पुढील बातम्या