वादग्रस्त माजी कुलगुरू राजन वेळुकर यांचा आणखी एक प्रताप

वादग्रस्त माजी कुलगुरू राजन वेळुकर यांचा आणखी एक प्रताप

मुंबई विद्यापीठाचे माजी वादग्रस्त कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. डॉ. राजन वेळुकर अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नशांबदी मंडळाने थेट जलसंपदा मंत्र्यांनाच व्यसनमुक्ती केंद्र काढण्याचा आगाऊ सल्ला दिलाय. तेही त्यांच्याच मतदारसंघात. निमित्त अर्थातच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त विधानाचे आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : मुंबई विद्यापीठाचे माजी वादग्रस्त कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. डॉ. राजन वेळुकर अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नशांबदी मंडळाने थेट जलसंपदा मंत्र्यांनाच व्यसनमुक्ती केंद्र काढण्याचा आगाऊ सल्ला दिलाय. तेही त्यांच्याच मतदारसंघात. निमित्त अर्थातच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त विधानाचे आहे.

दारूच्या ब्रँडला महिलांचे नाव द्यावे, असं विधान जलसंपदा मंत्र्यांनी केलं होतं. त्यावर टीका होताच त्यांनी रिसतर दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यामुळे खरंतर हा विषय संपला होता. पण सरकारच्या मेहेरबानीने नशाबंदी मंडळाचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतलेले यावर गप्प बसतील तर ते डॉ. राजन वेळुकर कसले ! त्यांनी चक्क मंत्र्यांनाच प्रायश्चित्त घेण्याचा सल्ला दिलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदारसंघात किमान 25 व्यसनमुक्ती केंद्र काढून त्यांच्या दारूप्रेमी आणि महिलाविरोधी विधानाचे प्रायश्चित्त करावे, असं फर्मानच डॉ. राजन वेळुकर अध्यक्ष असलेल्या नशाबंदी मंडळाने काढलंय. गंम्मत म्हणजे शासनाच्याच उपक्रमाचाच भाग असलेलं एखाद महामंडळ खरोखर अशा पद्धतीने शासनाच्याच मंत्र्यांविरोधात असा पत्रक काढू शकतं का हा खरंतर संशोधनाच विषय आहे. पण डॉ. राजन वेळुकरांनी मात्र, हे धाडस केलंय हेही तितकंच खरं...

वर्षा विद्या विलास ह्या या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस तर अमोल मडाने हे चिटणीस आहेत. अमोल मडाने यांच्या स्वाक्षरीने हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलंय. त्यामुळे मंत्रीविरोधी पत्रकावरून मुख्यमंत्री राजन वेळुकरांवर नेमकी काय कारवाई करणार हे पाहावे लागेल. कारण त्यांचा पूर्वइतिहास पाहता ते पदावरून काढल्याशिवाय राजीनामा देत नाहीत. शैक्षणिक अपात्रतेवरूनच त्यांना मुंबई विद्यापीठाचं कुलगुरूपद गमवावं लागलं होतं, हा इतिहास अजूनही ताजा आहे. बघुयात शासनस्तरावरून वेळुकरांवर आता नेमकी काय कारवाई होतेय ते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 06:01 PM IST

ताज्या बातम्या