राज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार !

शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दस्तुरखुद्द राज ठाकरे त्यांची प्रगट मुलाखत घेणार आहेत. विशेष म्हणजे या प्रगट मुलाखतीमध्ये कोणतंही 'मॅचफिस्किंग' असणार नसल्याचं संयोजकांनी स्पष्ट केलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 13, 2017 06:47 PM IST

राज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार !

13 डिसेंबर, पुणे : नव्या वर्षाच्या सुरूवातीला दोन दिग्गज नेत्यांच्या प्रगट मुलाखतीची जुगलबंदी उभ्या महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार आहे. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि ख्यातनाम वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी हा योग जुळवून आणलाय. पुण्यातल्या बीएमसी कॉलेजच्या प्रांगणात हा प्रगट मुलाखत सोहळा रंगणार आहे. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दस्तुरखुद्द राज ठाकरे त्यांची प्रगट मुलाखत घेणार आहेत. विशेष म्हणजे या प्रगट मुलाखतीमध्ये कोणतंही 'मॅचफिस्किंग' असणार नसल्याचं संयोजकांनी स्पष्ट केलंय.

खरंतर राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्यांमधून शरद पवारांना अनेकांना फटकारलं आहे. तर पवारांनी '' राज ठाकरेंना राजकारणात टिकण्यासाठी जाहीरपणे सकाळी लवकर उठण्याचा सल्ला दिलाय. थोडक्यात कायतर हे दोन्ही नेते प्रथमच प्रगट मुलाखतीच्या निमित्ताने समोरासमोर उभे ठाकणार असल्याने त्यांच्यात जुगलबंदी रंगली नाहीतर नवलच...! राज ठाकरेंचं 'टायमिंग' आणि शरद पवारांचा 'हजरजबाबी'पणा उभ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहेच. त्यामुळे दोन दिग्गजांमधील जुगलबंदी आत्तापासूनच उत्सुकता लागलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...