राज ठाकरेंचं बहुचर्चित फेसबुक पेज लॉन्चिंगलाच 'व्हेरिफाईड'!

राज ठाकरेंचं बहुचर्चित फेसबुक पेज लॉन्चिंगलाच 'व्हेरिफाईड'!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अखेर फेसबुकवर आलेत. आज त्यांनी स्वतःचं फेसबुक पेज लॉन्च केलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंचं हे फेसबुक नेटीझन्सच्या उदंड प्रतिसादामुळे लॉन्चिंगलाच 'व्हेरिफाईड'ही झालंय. यापुढे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच लोकांशी संवाद साधू, असंही राज ठाकरे म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अखेर फेसबुकवर आलेत. आज त्यांनी स्वतःचं फेसबुक पेज लॉन्च केलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंचं हे फेसबुक नेटीझन्सच्या उदंड प्रतिसादामुळे लॉन्चिंगलाच 'व्हेरिफाईड'ही झालंय. यापुढे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच लोकांशी संवाद साधू, असंही राज ठाकरे म्हणाले. पक्षाची ध्येयं धोरण आणि पक्षाने केलेली जनहिताची कामं जनतेला कळावीत, यासाठीही या पेजचा उपयोग केला जाईल, असंही राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलंय. फेसबुक पेज लॉन्चिंगच्या भाषणात राज ठाकरेंनी अपक्षेप्रमाणेच विरोधकांसह मोदींवरही टीका केली. दाऊद आणि भाजपचं साटलोटं असून त्याचा आता भारतात यायची इच्छा असून भाजप त्याचं श्रेय घेणार आहे, असा मोठा गौप्यस्फोटही राज ठाकरेंनी यावेळी केला.

राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -    

राज ठाकरेंचे फटकारे आता सोशल मीडियावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं फेसबुक पेज लाँच

'सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय पेज आपल्यासमोर आणायचंय'

पक्षाची कामं, धोरणं जनतेला कळावीत म्हणून फेसबुक - राज

फेसबुक पेजवरील राज ठाकरेंचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध

न हसायला मी काही अजित पवार नाही - राज ठाकरे

'आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार'

फेसबुकवर जी माहिती देणार ती खरी देणार - राज

'मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर 48 टक्के अकाऊंट फेक'

राहुल गांधींच्या ट्विटरवर 54 टक्के अकाऊंट फेक - राज

'मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा पहिला मी'

खोट्या प्रचाराला काय अर्थ, काळा पैसा गेला कुठे? - राज

राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर सडकून टीका

'सोशल मीडिया अंगलट आल्यावर भाजपला जाग'

भाजप सरकारची नोटाबंदी फसली - राज ठाकरे

'कॉंग्रेसच्या काळात भाजपनं नोटाबंदीला विरोध केला'

साडेतीन वर्षांत फक्त नोटांचा रंग बदलला - राज

भाजपमधील मराठी नेते हुजरे झालेत - राज ठाकरे

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन नक्की कुणासाठी? - राज

बुलेट ट्रेनच्या आडून कुणाला जगवताय? - राज ठाकरे

'बुलेट ट्रेन आणून मराठी माणसांचं अस्तित्व संपवण्याचा घाट'

मुंबई गुजरातला जोडण्याचे उद्योग कुणासाठी? - राज ठाकरे

'बुलेट ट्रेनपेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या'

मराठी माणसाला नख लावलात तर धिंगाणा घालू - राज

'सिंधुदुर्गात एकाचा फुटबॉल करून टाकला'

नारायण राणेंचं नाव न घेता राज ठाकरेंची टीका

मराठी भाषेबाबत आपण आग्रही का नाही? - राज ठाकरे

आपण आपल्या राज्याचा विचार का करत नाही? - राज

'2 वर्षांत 30 हजार विहिरी खोदल्याची मुख्यमंत्र्यांची थाप'

आम्हाला थापा मारणारं सरकार नको - राज ठाकरे

दाऊदला स्वत:च भारतात यायचंय - राज ठाकरे

'दाऊदला आणल्याचं श्रेय भाजप निवडणुकीत घेणार'

मनसेचा व्हॉट्सॲप क्रमांक : 7666662673

फेसबुक पेजवरचे अपडेट या क्रमांकावर मिळतील - राज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 01:27 PM IST

ताज्या बातम्या