S M L

राज ठाकरेंच्या कुंचल्यांतून आता मोहन भागवतांनाही फटकारे !

"क्या है रे इकडे? चलो पलिकडे! दांडुका दैखा नही क्या हमारा? एक एक को पुस्तक फेकके मारेगा! समजलं क्या?" त्यावेळी पळणारे पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेकी म्हणतात, "भागोsss! भागवत आया!"

Chandrakant Funde | Updated On: Feb 14, 2018 07:03 PM IST

राज ठाकरेंच्या कुंचल्यांतून आता मोहन भागवतांनाही फटकारे !

14 फेब्रुवारी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोहन भागवतांनी आपल्या कुंचल्यांद्वारे फटकारलंय. सरसंघचालक मोहन भागवतांनी युद्धासाठी लष्कराला तयारीसाठी 6-7 महिने लागतात पण आमच्या स्वयंसेवक संघाला तीन दिवसही पुरेसे असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या याच विधानावरून मोठं वादंगही झालंय. हाच मुद्दा घेऊन राज ठाकरेंनी आज एक खुमासदार कार्टून काढून संघ परिवाराला चिमटे काढलेत. राज ठाकरेंनी आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवरुन हे व्यंगचित्र शेअर केले आहे.

काय दाखवलंय व्यंगचित्रात ?व्यंगचित्रात सरसंघचालक मोहन भागवत झोपले आहेत आणि त्यांना 'थंडीतील एक उबदार स्वप्न!' पडलंय. त्यात मोहन भागवत आणि स्वयंसेवक काठ्या घेऊन उभे आहेत आणि त्यांच्यासमोर 'संघ विचार', 'बौद्धिक', 'चिंतन' अशा पुस्तकांचा ढीग आहे. स्वप्नातच मोहन भागवत पाकिस्तान आणि अतिरेक्यांना उद्देशून म्हणतात, "क्या है रे इकडे? चलो पलिकडे! दांडुका दैखा नही क्या हमारा? एक एक को पुस्तक फेकके मारेगा! समजलं क्या?" त्यावेळी पळणारे पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेकी म्हणतात, "भागोsss! भागवत आया!"

राज ठाकरेंनी आजवर खरंतर आपल्या व्यंगचित्रांमधून मोदी, शाह, उद्धव ठाकरे यांना फटकारलं नेहमीच बघायला मिळतं. पण यावेळी राज ठाकरेंनी प्रथमच सरसंघचालक मोहन भागवतांनाही फटकारलंय. आता या कार्टूनवर संघ परिवारातून नेमकी कशी प्रतिक्रिया येते, हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 07:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close