हेडगेवार - गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला ?- राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना फटकारलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2018 08:16 PM IST

हेडगेवार - गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला ?- राज ठाकरे

09 फेब्रुवारी, मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या कुंचल्याद्वारे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना फटकारलंय. यावेळी निमित्त अर्थातच मोदींच्या संसदेतील भाषणाचे आहे. या भाषणात मोदींनी पुन्हा एकदा नेहरू - पटेल वाद उकरून काढत, काँग्रेसनं सरदार पटेलांना पंतप्रधान न करून त्यांच्या अन्याय केल्याचा गंभीर आरोप केलाय. राज ठाकरेंच्या या नव्या कोऱ्या कार्टूनमध्ये महात्मा गांधी पंतप्रधान मोदींना समजावताना म्हणतात, '' अरे बेटा नरेंद्र, तुला जरा दोन गोष्टी सांगायच्या आहेत ! जवाहरलालना पंतप्रधान मी केले! काँग्रेसने नाही. यावर काही बोलायचंय ? आणि दुसरं म्हणजे वल्लभभाई जरी देशाचे गृहमंत्री होते, तरी ते काँग्रेसचेच नेते होते ना ? मग तुला त्यांचा पुतळा का उभारावासा वाटला ! पण तू जिथून आलास, त्या हेडगेवारांचा किंवा गोळवलकरांचा पुतळा उभारावासा का नाही वाटला ? प्रचारक होतास ना तू ?

या कार्टूनमधील शेवटच्या वाक्यातच राज ठाकरेंनी मोदींसोबतच संघ परिवारालाही लक्ष्यं केल्याचं स्पष्ट होतंय. कारण नेहमीच काँग्रेस आणि महात्मा गांधींना पाण्यात पाहणाऱ्या संघ परिवाराला मोदींच्या नेतृत्वात देशात एकहाती सत्ता मिळाल्यानंतरही पुन्हा काँग्रेसच्याच नेत्यांचा प्रतिकं म्हणून का वापर करावा लागतोय ? अशाच खडा सवाल राज ठाकरेंनी या कार्टूनद्वारे उपस्थित केलाय.

विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत याच मोदींच्या राजकीय प्रेमात पडून राज ठाकरेंनी स्वतःच्या मनसेची वाताहात करून घेतली होती. पण हल्ली तेच राज ठाकरे उठता बसता मोदींना फक्त शाब्दिकच नाहीतर आता कुंचल्यामधूनही फटकारे मारू लागलेत !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 08:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...