S M L

'खळ खट्याक'कडून संवादाकडे, राज ठाकरे साधणार का उत्तर भारतीयांशी संवाद?

पंचायतीतर्फे दोन डिसेंबरला एका संवाद सभेचं आयोजन करण्यात आलंय. त्या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून राज यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Updated On: Oct 12, 2018 03:49 PM IST

'खळ खट्याक'कडून संवादाकडे, राज ठाकरे साधणार का उत्तर भारतीयांशी संवाद?

मुंबई, ता. 12 ऑक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर भारतीय महापंचायतीनं एका कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय. पंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शुक्रवारी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. पंचायतीतर्फे दोन डिसेंबरला एका संवाद सभेचं आयोजन करण्यात आलंय. त्या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून राज यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी येण्याचं राज ठाकरे यांनी मान्य केल्याचा दावा दुबे यांनी केलाय.

मात्र राज ठाकरे यांनी यावर अद्याप निर्णय घेतला नाही. कार्यक्रमाला जायचं किंवा नाही याबाबत तेच निर्णय जाहीर करतील असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरे यांची भूमिका जगजाहीर आहे.मनसेनं अनेकदा अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलनही केली आहेत. त्यामुळं उत्तर भारतीयांचा त्यांच्यावर राग असल्याचं बोललं जातंय. पण काही लोक मुद्दाम दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळं तणावही निर्माण होतो. हा वाद शांत करण्यासाठी आणि संवाद निर्माण करण्यासाठी राज ठाकरेंना बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पंचायतीनं राज ठाकरेंना दिलेल्या निवेदनात म्हटलंय.

राज ठाकरेंचं महाराष्ट्र आणि उत्तर भारतीयांच्या विकासात योगदान आहे. गैरसमज मिटावेत, संवादाचं पर्व सुरू व्हावं, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचं आहे. त्यांची उत्तर भारतीयांबद्दल काय भूमिका आहे हे थेट त्यांच्याकडून समजून घ्यावं आणि त्यांना आमचे विचार सांगण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचंही पंचायतीचे अध्यक्ष दुबे यांनी सांगितलं.

VIDEO भयंकर! भारतातल्या 'तितली'सह जगभरात ३ चक्रीवादळांचं असं सुरू आहे थैमान

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 03:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close