भारताने केलेल्या हल्ल्यावर राज ठाकरे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...!

'भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो.'

News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2019 07:16 PM IST

भारताने केलेल्या हल्ल्यावर राज ठाकरे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...!

मुंबई, 26 फेब्रुवारी : गेल्या 12 दिवसांआधी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारताने CRPF चे 42 जवान गमावले. मंगळवारी भारताच्या वायुसेनेनं या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. आज भारताच्या वायुसेनेनं पाक व्याप्त काश्मीरमध्ये सीमा रेखा ओलांडत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कॅम्प उध्वस्त केले. यावर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्याचं कौतूक होतं असताना आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय वायुदलाचं कौतुक करत राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे. 'भारतीय हवाई दलाने ज्या पद्धतीने अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केले, त्या बद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भारतीय हवाई दलाचं मनापासून अभिनंदन करतो.' असं लिहित त्यांनी ट्वीट केलं आहे.

सगळ्यात मोठी बातमी: पाहा, भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या बातम्या विदेशी मीडियाने कशा दाखवल्या



दरम्यान, पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे असंदेखील ट्वीट राज ठाकरे यांनी आधी केलं होतं. हे ट्वीट करताना राज ठाकरे यांनी शहीदांना श्रद्धांजली देत या हल्ल्याचा बदला घ्या असं त्यांनी म्हटलं होतं.



असा झाला Air Srrike

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायु दलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

संबंधित बातम्या : AirStrikes करण्याआधी भारताने वापरले हे ड्रोन, पाकचे रडार झाले ठप्प

Air Strikeचा निर्णय मोदींचा

पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.

संबंधित बातम्या : सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूँगा - मोदींची प्रतिक्रिया

12 दिवसामध्ये मोदींचे पाकला सहा मोठे धक्के

- पुलवामा हल्ल्यामध्ये 100 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

- मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.

- मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर - कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. याप्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू - काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

हेही वाचा: भारत-पाक सीमेवर राहणारे लोक हादरले; म्हणाले, 'आम्हाला वाटलं युद्ध सुरू झालं'

- पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.

- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...