गोविंद झाले काय गोपाळ झाले, राष्ट्रपती म्हणजे रबरस्टॅम्पच -राज ठाकरे

गोविंद झाले काय गोपाळ झाले, राष्ट्रपती म्हणजे रबरस्टॅम्पच -राज ठाकरे

राष्ट्रपती म्हणजे रबरस्टॅम्पच असेल तर मग गोविंद झाले काय गोपाळ झाले काय फरक पडतो अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत बोचरी टीका केली.

  • Share this:

24 जून : राष्ट्रपती म्हणजे रबरस्टॅम्पच असेल तर मग गोविंद झाले काय गोपाळ झाले काय फरक पडतो अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत बोचरी टीका केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या राजकारणावर आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला. देशाच्या सर्वोच्च अशा पदासाठी असं जातीपातीचं राजकारण होतंय. त्यामुळे या राजकारणाची आणि राजकारण्याची मला कीव येते अशा शब्दात राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.

तसंच आजवरच्या कोणत्या राष्ट्रपतीचा फायदा झालाय.  सर्वसामान्यांना याचा फायदा नाही. 5 वर्षांत तसं काही दिसून येत नाही. फक्त याकूब मेमनच्या बाबतीत तेवढे काय ते दिसले. पण राष्ट्रपती आपली भूमिका कधी बजावली? हा प्रश्न असून राष्ट्रपती म्हणजे रबरस्टॅम्प सारखे झाले आहे. ज्याची सत्ता त्याचा राष्ट्रपती होतो. मग गोविंद झाले काय गोपाळ झाले काय एकच अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

First published: June 24, 2017, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading