आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन, 'लाव रे फटाके' चे होर्डिंग लावल्याने राडा

आमदार प्रसाद लाड यांना धमकीचे फोन, 'लाव रे फटाके' चे होर्डिंग लावल्याने राडा

लाव रे तो व्हिडीओ सभांचा बार फुसका निघाल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे आता भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

  • Share this:

मुंबई 23 मे: लोकसभेच्या निवडणूक निकालांमध्ये राज्यात युतीला घवघवीत यश मिळालं. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विरोधात पुरावे देणाऱ्या सभा घेऊन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र त्या लाव रे तो व्हिडीओ सभांचा बार फुसका निघाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सायन परिसरात आज लाव रे फटाको, वाजव रे ढोल असे बोर्ड लावण्यात आले. त्यानंतर मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि राडा झाला.

या घटनेनंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना धमक्यांचे फोन येत आहेत. राज ठाकरेंनी आपल्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडिओ पुरावे म्हणून सादर केले होते. त्या भाषणांची प्रचंड चर्चा झाली. त्या भाषणांचे व्हिडिओ व्हायरलंही झाले होते. राज यांच्या भाषणांमुळे फटका बसतो असं वाटू लागल्याने भाजपही सावध झालं होतं.

त्यानंतर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी खास सभा घेऊन राज यांच्या आरोपांना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तरही दिलं होतं. मित्रा तु चुकलास असंही राज यांना म्हणाले होते. राज यांनी आपल्या भाषणांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन नेत्यांवर घणाघाती टीका केली होती. या दोन नेत्यांपासून देशाला मुक्त करा असं आवाहनही त्यांनी लोकांना केलं होतं. भाजपला मतं देऊ नका असंही ते म्हणाले होते.

राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा पोहोचविण्यासाठी ही सगळी धडपड केली अशी टीक होऊ लागली. पण निकाल लागल्यानंतर मनसे फॅक्टरचा काहीही परिणाम झाला नाही हे स्पष्ट झाल्याने टीकेची परतफेड करण्यासाठी भाजपकडून हे लाव रे फटाके, वाजव रे ढोल हे होर्डींग्ज् लागवल्याचं बोललं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 10:35 PM IST

ताज्या बातम्या