News18 Lokmat

'ये अंदर की बात है..,राज ठाकरे हमारे साथ है'

विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी हे मनसेच्या व्यासपीठावर हे वक्तव्य केलंय.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2018 06:01 PM IST

'ये अंदर की बात है..,राज ठाकरे हमारे साथ है'

ठाणे, 03 सप्टेंबर : ठाण्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी "ये अंदर की बात है...राज ठाकरे हमारे साथ है...छुपा साथ हैं.." असं वक्तव्य करून राजकारणात नव्या विषयाची 'हंडी' फोडलीये. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी हे मनसेच्या व्यासपीठावर हे वक्तव्य केलंय.

ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भव्य दहीहंडीचं आयोजन केलंय. 10 थर लावणाऱ्या मंडळाला 21 लाखांचे बक्षीस जाहीर केलंय. दुपारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली. मनसेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची एंट्री पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी  स्टेजवर वादग्रस्त वक्तव्य केलं. 'ये अंदर की बात है...राज ठाकरे हमारे साथ है असं म्हणत त्यांनी हा छुपा साथ है हे म्हणायला विसरले नाही. त्यांच्या या विधानामुळे एकच गोंधळ उडाला.

विशेष म्हणजे, जितेंद्र आव्हाड यांनी 3 तास स्टेजचा ताबाच घेतला. गेली ३ तास व्यासपीठावरून त्यांचाच उत्सव असल्याप्रमाणे बिंधास्त होऊन वावरत होते. एवढंच नाहीतर गोविंदांच्या खांद्यावर बसूनही नाचले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून हा मनसेचा कार्यक्रम हायजॅक झालाय की काय अशी चर्चा रंगली होती.

भरात भर म्हणजे,  पाचपाखडी येथील विरोध करणाऱ्या स्थानिक रहिवाश्यांना जितेंद्र आव्हाज नतद्रष्ट म्हणाले. मनसेच्या दहिहंडी उत्सवात शेजारील इमारतीवरील रहिवाशांच्या चांगल्या प्रतिसादावर मनातील खंत व्यक्त केली. पण पाचपाखडीच्या त्रस्त रहिवाशांना नतद्रष्टं म्हटल्यामुळे आता पुन्हा वाद होणार हे नक्की.

विशेष म्हणजे, जून महिन्यात जितेंद्र आव्हाड यांनी 'कृष्णकुंज'वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली होती. शरद पवार यांनी समविचारी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन केलं होतं. त्यानंतर आव्हाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

Loading...

VIDEO: मै हूँ डॉन...शिवेंद्रराजेंचा ठेका !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2018 06:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...