मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यात -राजू शेट्टी

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यात -राजू शेट्टी

तुमचे धंदे आम्हाला माहीत नाहीत काय ?, समृद्धी हायवे तुम्हाला कशासाठी हवा आहे ते आम्हाला माहितीये. तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयातल्या लोकांनी आधीच जमिनी लाटल्या आहेत, शेतकऱ्यांना फसवलंय, असा आरोप राजू शेट्टींनी केला.

  • Share this:

30 मे : शेतकऱ्यांची या सरकारनं घोर फसवणूक केलीय. मला लालदिव्याचा मोह नाही,सत्तेची भूक नाही. माझ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा मला तुमचं थोबाड पाहायाचं नाही अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केलीय. तसंच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यात असा असा आरोपही राजू शेट्टींनी केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आत्मक्लेश यात्रेचा आज आठवा दिवस होता. मानखुर्द येथून सकाळी यात्रेला सुरूवात झाली, सायन माटुंगा मार्गे परेल येथे पदयात्रा येऊन पोहचली. यावेळी राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं. तुमचे धंदे आम्हाला माहीत नाहीत काय ?, समृद्धी हायवे तुम्हाला कशासाठी हवा आहे ते आम्हाला माहितीये. तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयातल्या लोकांनी आधीच जमिनी लाटल्या आहेत, शेतकऱ्यांना फसवलंय, असा आरोप राजू शेट्टींनी केला.

हे मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्षात होते. तेव्हा म्हणायचे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा असं म्हणायचे साता-यामध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्याविरोधात ज्या व्यक्तीनं निषेध केला त्या व्यक्तीच्या घरच्यांना बायको, पत्नी, मुलांना पोलीस स्टेशनात नेण्यात आलं. फडणवीस, तुम्हांला दोन हात करायचा असेल तर या होऊन जाऊ द्या असं आव्हानच राजू शेट्टींनी दिलं.

तुम्ही पाणी पाजलं नाही. तुम्ही वैद्यकीय सेवा दिल्या नाही म्हणून आम्ही काय मेलो नाही. आम्ही 4 जिल्ह्यातून चालत आलो पण एकाही जिल्हाधिकारी ने विचारलं नाही. पण सामान्य महिलांनी आम्हाला पाणी पाजलं जे आज शेतकरी चळवळीत फूट पडू पाहत आहेत म्हणून काही लोकं शेतकऱ्यांशी बोलायला गेले आहेत. मध्यस्थी करायला केलेत मला तुमचं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही माझ्या शेतकरांचा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांना सातबार कोरा केला नाही तर सर्व मेट्रो सिटीना पुणे, औरंगाबाद,मुंबईला जाणारा दूध भाजीपाल आम्ही अडवू असा इशाराही राजू शेट्टींनी दिला.

First published: May 30, 2017, 5:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading