मुंबई, 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज फेरीवाल्यांच्या मुद्यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची पालिका मुख्यालयात जाऊन भेट घेतली. लोकांना फेरीवाल्यांची तक्रार करायची असल्यास त्यांचे फोटो पाठवण्याची सोय करण्याची मागणी राज ठाकरेंनी आयुक्तांकडे केली.
लोकांना व्हॉट्सअपवर फोटो पाठवण्यासाठी पालिकेने काही नंबर जाहीर करावेत. या व्हाट्सअप क्रमांकावर नागरिकांना त्यांच्या विभागातील किंवा रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांचे फोटो पाठवता येतील. आणि महापालिकेला फेरीवाल्यांवर नियमित कारवाई करणं तसेच या समस्येवर नियंत्रण मिळवणं सोपे जाईल असा मुद्दा राज ठाकरेंनी मांडला. या आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पावलं उचलण्याचं आश्वासन दिले आहे.
रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमनामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहूतक कोंडी होते. तसंच पादचाऱ्यांनाही फूटपाथवरून नीटपणे चालता येत नाही. म्हणून रेल्वे पुलावरील फेरीवाले हटवल्यानंतर राज ठाकरेंनी आपला मोर्चा रस्त्यावरील फेरीवाल्यांकडे वळवलाय. 5 ऑक्टोबरच्या मनसेच्या मोर्चालाही मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी रेल्वेस्टेशनवरील अवैध फेरीवाले आणि पथारीवाले हमनसेटवले होते. नागरिकांमधून त्याचं प्रचंड स्वागत झालं होतं. म्हणूनच राज ठाकरेंनी आता मुंबईच्या रस्त्यावरील अवैध फेरीवाल्यांचा मुद्दाही उचलून धरलाय. बीएमसीने फेरीवाल्यांवर कारवाई केली नाहीतर आंदोलन करू, असा इशारही मनसेतर्फे देण्यात आलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा