लिव्ह-इनमध्ये असणाऱ्या महिलेचं कापलं नाक, चारित्र्यावर संशय

लिव्ह-इनमध्ये असणाऱ्या महिलेचं कापलं नाक, चारित्र्यावर संशय

आपलं नवं घर दाखवण्यासाठी प्रेमिकाला युवक घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला खुर्चीला बांधलं आणि चाकूने वार करत तरुणीचं नाक कापलं.

  • Share this:

छत्तीसगड, 18 मे : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रेमीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेमिकेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचं नाक कापल्याची घटना घडली आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आपलं नवं घर दाखवण्यासाठी प्रेमिकाला युवक घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला खुर्चीला बांधलं आणि चाकूने वार करत तरुणीचं नाक कापलं. आधी स्वत: महिलेचं नाक कापलं आणि त्यानंतर तिला त्याने रुग्णालयात उपचारासाठी नेलं. गाडीवरून पडल्यानंतर तिच्या नाकाला लागलं असल्याचं खोटं कारण त्याने डॉक्टरांना सांगितलं.

या सगळ्या प्रकारानंतर पीडित महिलेने प्रियकराच्या विरोधात कोतवाल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणात आता अधिक तपास करत आहेत. दरम्यान, महिलेच्या नाक कापलं गेल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : गरोदर महिलेची हत्या करून पोटातून मुल काढलं बाहेर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक आणि पीडित तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. तरुणीला 2 मलुंदेखील आहेत. महिलेच्या चारित्र्याच्या संशयावरून युवकाने तिचं नाक कापल्याची माहिती देण्यात आली आहे.

'2009 पासून आम्ही सोबत आहोत. पण प्रत्येक दिवशी चारित्र्याच्या संशयावरून मला मारहाण करायचा. गुरुवारीदेखील घर दाखवण्याच्या बहाण्याने तो मला घरी घेऊन गेला आणि त्याने माझ्या नाकावर चाकू फिरवला.' अशी तक्रार तरुणीने पोलिसांत दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

VIDEO : झिंगाट वऱ्हाडी मंडळाने पोलिसालाच केली बेदम मारहाण

First published: May 18, 2019, 8:30 PM IST

ताज्या बातम्या