समोर आला एम.एस. धोनीचा रिटायरमेन्ट प्लॅन, करणार हे विशेष काम

धोनी निवृत्तीनंतर करणार काय हा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना सतावत आहे. तो अनेक कामात स्वतःचं नशिब आजमावत आहे.

  • Share this:

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियासाठी निवडल्या गेलेल्या टी२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. २०१९ च्या वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचं अलविदा करणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

मात्र, धोनी निवृत्तीनंतर करणार काय हा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना सतावत आहे. धोनीनेही याबद्दल विचार करायला सुरूवात केली आहे. तो अनेक कामात स्वतःचं नशिब आजमावत आहे.

नुकतंच धोनीने छत्तीसगडमध्ये खेळाडूंसाठी क्रिकेट अकादमी सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी धोनीने क्रिडा विभागाला एक ड्राफ्टही पाठवला आहे.

रायपुरचे शहीद वीरनारायण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममध्ये अकादमी सुरू करण्याचा विचार धोनी करत आहे. क्रिडा विभागाने एमओयूवर आपली टिपणी दिल्यानंतर राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.

क्रिडा आणि युवा कल्याण विभागाचे डायरेक्टर धर्मेश साहू यांनी याबद्दल सांगितले की, महेंद्र सिंग धोनीकडून अकादमी सुरू करण्याचा प्रस्ताव आला आहे. नियमांनुसार या प्रस्तावावर विचार करण्यात येईल आणि त्यानंतर राज्य शासनाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात येईल. पण जर ही अकादमी सुरू झाली तर याचा फायदा स्थानिक खेळाडूंना होईल.

धोनीने हा प्रस्ताव पोस्टातून पाठवला आहे. क्रिडा विभाग हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवेल. यानंतर राज्य सरकारचं यावर अंतिम निर्णय घेईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राष्ट्रीय क्रिकेट संघ (CSCS) राज्य सरकारकडून ९० वर्षांसाठी स्टेडिअम भाड्याने घेण्याचा विचार करत आहे. जर स्टेडिअम सीएसीएसला मिळालं तर धोनी त्याची अकादमी सुरू करू शकत नाही. तसेच छत्तीसगड क्रिडा आणि युवा कल्याण विभागही मैदान भाड्याने घेण्याच्या विचारात आहे. यानंतर सीएससीएस आणि बीसीसीआयच्या अंतर्गत हे मैदाना जाईल. यामुळे इथे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळवण्यात येऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 01:50 PM IST

ताज्या बातम्या