कोल्हापुरात पावसाचं पुनरागमन

कोल्हापुरात पावसाचं पुनरागमन

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दडी मारली होती.

  • Share this:

कोल्हापूर,09सप्टेंबर: कोल्हापूर शहर आणि परिसरात आज दिवसभरात जोरदार पाऊस झालाय. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दडी मारली होती.

पावसाने दडी मारल्यामुळे  बळीराजा चिंतेत होता. त्याचबरोबर कोल्हापूर शहराचे नागरिकही उकाड्याने हैराण झाले होते. पण आज कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेले कोल्हापूरकर या पावसामुळे चांगलेच सुखावले. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही जोरदार पाऊस असून अजूनही पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत.

सध्या कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 04:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading