यंदा गुलाबी थंडी विसरा, दिवाळीनंतरही पाऊस पिच्छा सोडणार नाही!

यंदा गुलाबी थंडी विसरा, दिवाळीनंतरही पाऊस पिच्छा सोडणार नाही!

25 आणि 26 ऑक्टोबरला महाराष्ट्रात चक्रीवादळाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

पुणे, 23 ऑक्टोबर : सध्या राज्यात सुरू असलेला मान्सुनोत्तर पाऊस कदाचित दिवाळीनंतरही काही दिवस रेंगाळेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र अशा दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने राज्यात ही पावसाळी परिस्थिती निर्माण झाल्याचं पुणे वेध शाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुप कश्यपी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 25 आणि 26 ऑक्टोबरला महाराष्ट्रात चक्रीवादळाची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

या चक्रीवादळामुळे मुंबई ठाणे आणि परिसरात मुसळधार पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस आणि चक्रीवादळाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यासह राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता असल्याचंही पुणे वेधशाळेने म्हटलं आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो.

तसेच मुंबई वेधशाळेने राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असेल. त्यामुळे गुलाबी थंडीत येणारी दिवाळी यावेळी ऐन पावसात साजरी करावी लागणार, अशी चिन्हे आहेत. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मंगळवार आणि बुधवार मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे सतर्क राहा, असा इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारपर्यंत सतर्कतेचा इशारा म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या - मतमोजणीच्या तोंडावर नवा सर्व्हे, वंचित आणि मनसे खोलणार खातं!

या काळात मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असा सल्लाही हवामान विभागाने दिलाय. हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार पाऊस होऊ शकतो. मान्सून महाराष्ट्रातून परतल्यानंतरही पाऊस अजुनही राज्यात रेंगाळलेलाच आहे. पुणे आणि राज्यातल्या काही भागात पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पिकांचे मोठे नुकसान...

महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, ज्वारी, कपाशी पीक पूर्णपणे नष्ट झाले. या पावसाचा द्राक्ष बागांना देखील मोठा फटका बसलाला मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात कापणी केलेले भातपीक पुरते वाया गेले आहे.

इतर बातम्या - परळीतून 'या' मुंडेंना सगळ्यात मोठा धक्का, पाहा काय आहे EXIT POLLचा निकाल!

राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे. या पावसामुळे हाती आलेली बाजरी, ज्वारी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे 40 टक्क्यांहून अधिक मका, बाजरी, ज्वारी पीक खराब झाले आहे. सोयाबीन पीक शेतात सडू लागली आहेत. येत्या 24 तासांत राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दुष्काळी बीड, लातूर आणि उस्मानाबाद मध्ये पाऊस पडत आहे. पण हाती आलेले पीक वाया गेले आहे. परभणीत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पडत असून कापूस, मका पिकाचे नुकसान झाले आहे.

अन्य बातम्या -

पत्नीच्या मृत्यूनंतर समोर आलं धक्कादायक सत्य, लग्नाआधी पतीने केलं होतं...!

भारत-पाक सीमेवर गोळीबार, महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण!

विधानसभेच्या निकालापूर्वीच काढली विजयी मिरवणूक, NCPच्या 'या' उमेदवारावर गुन्हा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 05:41 PM IST

ताज्या बातम्या