Weather Updates: पुढच्या 48 तासांत असा असेल पाऊस; मुंबई, कोकणसह 'या' शहरांतील पावसाचे अपडेट

Weather Updates: पुढच्या 48 तासांत असा असेल पाऊस; मुंबई, कोकणसह 'या' शहरांतील पावसाचे अपडेट

गेल्या काही दिवसांत कोकण किनाऱ्यालगत विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासारख्या इतर भागात मध्यम प्रमाणात पाऊस झाला.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : महाराष्ट्रात उशिरा दाखल झालेल्या पावसाने गेल्या काही दिवसांत तुफान बॅटिंग गेली. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली तर अनेक ठिकाणी मोठी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान झालं. गेल्या 4-5 दिवसापासून बरसणाऱ्या पावसाचा जोर मात्र आता कमी झाला आहे. मुंबईमध्ये आज पावसाने दडी मारल्याचं पाहायला मिळालं. काही उपनगरांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली.

हवामान खात्याच्या आजच्या अंदाजानुसार, दक्षिण गुजरात, महाराष्ट्रतील कोकण, मुंबईसह पुढच्या 48 तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई काही प्रमाणात पावसाचा जोर कमी असेल पण कोकण आणि गोव्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पावासाचा जोर कायम राहिल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत कोकण किनाऱ्यालगत विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासारख्या इतर भागात मध्यम प्रमाणात पाऊस झाला.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला असं चित्र आहे. अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर काही भागात अजूनही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शिर्डीमध्ये पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मुळा आणि भंडारदरा धरणांच्या पाणलोटात मान्सूनने जोर धरला असून भंडारदऱ्याच्या पाणीसाठ्यात 12 तासात 520 द.ल.घ. फुट पाण्याची विक्रमी आवक झाली आहे.

दुसरीकडे मुळा नदीच्या खोऱ्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने आंबित धरणापाठोपाठ पिंपळगाव खांड हे छोटे धरणंही ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहती झाली आहे. मुळा नदी वाहती झाल्याने दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या संगमनेर तालुक्यातील पठारभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. याचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी ढोल-ताश्यांच्या गजरात नदीच्या पाण्याचं पुजनही करण्यात आलं.

अहमदनगर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मुळा धरणात आजपासून नवीन पाण्याची आवक येण्यास सुरुवात होणार असल्याने लाभधारक नागरीक आणि शेतकरी आनंदी झाले आहेत.

पालघर, कासा, डहाणू, तलासरी, विक्रमगड परिसरात रात्रीपासून पावासाने हजेरी लावली आहे. गेले 3 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. परंतू शनिवारी रात्रभर रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले पुन्हा तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर अनेक सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे.

खेड - रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीवरील पुलावरून पुन्हा एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. पण नदीच्या पाण्याची पातळी खाली झाल्यानं वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची देण्यात आली आहे. दरम्यान, एकेरी वाहतूक सुरू असली तरी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. कारण, पावसाचा जोर अद्याप कायम आहे.

कोकणातील महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतून बंद करण्यात आली होती. या मार्गाची वाहतूक लाईफ केअर हॉस्पिटल येथून जाणाऱ्या बायपासने वळवण्यात आली होती. मात्र, पावसाने उसंत घेतल्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

जळगावमध्ये गेल्या 24 तासांत जळगाव शहरासह जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. जळगाव शहरात अनेक भागांमध्ये पाणी साठल्याचं चित्र आहे. प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्येदेखील समाधान व्यक्त केलं जात आहे.

नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पावसामुळे एकीकडे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला आहे. तर दुसरीकडे पाण्यात गाड्या अडकल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, नदीनाल्यांचं पाणी पातळीपेक्षा जास्त वाढल्यानं महापालिका प्रशासनानं काम केल्याचं सगळे दावे वाहून गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

First published: July 7, 2019, 3:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading