महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंता वाढवणारी बातमी, आता अस्मानी संकटाचे संकेत

महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंता वाढवणारी बातमी, आता अस्मानी संकटाचे संकेत

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात आणता येत नाही. त्यातच आता पुढील 5 दिवस हवामान विभागानं राज्यात सर्वत्र कमी-अधिक स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मार्च: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या 124 वर पोहोचली आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळी वारासह पाऊस काही भागात अंदाज आहे. मराठवाडा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्हात वादळी वारासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात आणता येत नाही. त्यातच आता पुढील 5 दिवस हवामान विभागानं राज्यात सर्वत्र कमी-अधिक स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होणार आहे. कोरोना व्हायरस पाठोपाठ शेतकऱ्यांवर अवेळी पावसाचंही संकट आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा...‘सॉरी उद्धवजी... मला तुमची माफी मागायचीय’ मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

वातावरण बदलामुळे पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई आणि पुण्यातही पावसाचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच अनेक भागात वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे.

गारपीटही होण्याची शक्यता...

मुंबईत 27 आणि 28 मार्चला काही ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्रात चार-पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल‌‌. सोमवारी आणि मंगळवारी काही ठिकाणी गारपीटही होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल‌. शिवाय दोन दिवस गारपीटीचीही शक्यता आहे.

हेही वाचा..कोरोनाचं थैमान रोखण्यासाठी वेगवान हालचाली, मुख्यमंत्री घेणार 4 हायप्रोफाईल बैठका

पुण्यात ढगाळ वातावरण...

पुणे शहर आणि जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत हे ढगाळ वातावरण राहील. मंगळवारपासून काही ठिकाणी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. त्याच बरोबर वादळ वाराही असेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे हवामान विभाग प्रमुख डॉ अनूप कश्यपी यांनी याबाबत माहिती दिली.

 

First published: March 26, 2020, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading