मुंबई, 11 मे : मुंबईच्या अंधेरी स्टेशनवर 9 मे रोजी दुपारी काळजाचं पाणी करणारी एक घटना घडली आहे. अंधेरी स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर उभा असलेला एक व्यक्ती अचानक रेल्वे ट्रॅकवर पडला आणि त्याचवेळी अवंतिका एक्सप्रेस त्या ट्रॅकवरून धावली. पण त्यानंतर फलाटावर उभ्या असणाऱ्या सगळ्यांनाच धक्का बसला. कारण, ट्रॅकवर पडलेला व्यक्ती एक्सप्रेस गेल्यानंतर एकदी ठणठणीत उभा राहिला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कसा आश्चर्यकारक हा व्यक्ती बचावला आहे.