मुंबई, 5 जुलै : तुम्ही सरकारी नोकरी शोधताय ? मग तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेनं भरती सुरू केलीय. अनेक पदांवर या व्हेकन्सीज आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी रेल्वेची आॅफिशियल वेबसाइट www.rrchubli.in वर अर्ज करावा.
दक्षिण पश्चिम रेल्वेनं गुड्स गार्ड, ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट आणि स्टेशन मास्टर या पदांवर भरती सुरू केलीय. उमेदवार 15 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकता. रेल्वेनं हेही सांगितलंय की शेवटच्या तारखेआधी अर्ज करा. उमेदवारांची निवड कम्प्युटरवर आधारित टेस्टद्वारे केलं जाईल. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षा असेल. या पदांसाठी सामान्य उमेदवारांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त 42 वर्ष, ओबीसीसाठी 45 आणि एससी, एसटी उमेदवारांसाठी 47 वर्ष आहे.
Union Budget 2019 : 20 रुपयांच्या नाण्यांची ही असेल खासीयत
शैक्षणिक योग्यता
स्टेशन मास्टर आणि गुड्स गार्ड पदांसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून पदवी हवी. ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट पदासाठी उमेदवार 12वी 50 टक्क्यांनी उत्तीर्ण हवा.
Union Budget 2019 : बजेटनंतर शेअर मार्केट गडगडलं
जे उमेदवार पदवी परीक्षा किंवा 12वी परीक्षा देतायत, ते अर्ज करू शकत नाहीत.
अॅडमिट कार्ड
प्रवेश परीक्षेचं अॅडमिट कार्ड परीक्षेच्या दोन आठवडे आधी वेबसाइटवर प्रसिद्ध केलं जाईल.
याशिवाय वेस्टर्न रेल्वे स्टेशन मास्टर पदासाठी 135 व्हेकन्सी काढल्यात. यासाठी उमेदवार ग्रॅज्युएट हवा. या पदाची भरती मुंबईत होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 जुलै.
Union Budget 2019 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडली ही परंपरा
वेस्टर्न रेल्वेनं काॅमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी 238 व्हेकन्सीज काढल्यात. या पदासाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे.
VIDEO: आरोग्य विभागाच्या इमारतीत भीषण आग, 60 जण अडकल्याची भीती