बाप्पाच्या मंडपात नाचवल्या बारबाला..अश्लील गाण्यावर थिरकले रेल्वे अधिकारी!

गणपती बाप्पाच्या जागरणात चक्क अश्लील गाण्यांवर बारबाला नाचवल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 09:20 PM IST

बाप्पाच्या मंडपात नाचवल्या बारबाला..अश्लील गाण्यावर थिरकले रेल्वे अधिकारी!

निलेश पवार, (प्रतिनिधी)

नंदुरबार, 08 सप्टेंबर: गणपती बाप्पाच्या जागरणात चक्क अश्लील गाण्यांवर बारबाला नाचवल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबार रेल्वे स्टेशन परिसरात लोको पायलट्सनी बसवलेल्या गणपतीच्या मंडपात हा प्रकार घडला आहे. एवढेच नाही तर अश्लील गाण्यावर बारबालांसोबत रेल्वे अधिकारीही थिरकले. सध्या हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

नंदुरबारच्या रेल्वे स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या गणपतीच्या मंडपात शुक्रवारी (6 सप्टेंबर) सायंकाळी गणेश मंडळातर्फे आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. आर्केस्ट्रा सुरू झाल्यानंतर अचानक अश्लील गाणे सुरू झाले आणि काही बारवाला त्यावर डान्स करू लागल्या. या वेळी काही कर्मचारीदेखील त्यांना प्रतिसाद देत थिरकत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात लोको पायलट विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, त्यांनी कोणीही प्रकारावर आक्षेप नोंदवला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनीही याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चहु बाजुंनी टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, याबाबत रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी बोलण्यास तयार नाही.

VIDEO: बाप्पाच्या कार्यक्रमाला महिलांची छमछम, अश्लील डान्सवर अधिकाऱ्यांचा ठुमका!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2019 09:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...