मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

लोकलने 4 जणांना चिरडलं, रूळ ओलांडताना घडली दुर्घटना

लोकलने 4 जणांना चिरडलं, रूळ ओलांडताना घडली दुर्घटना

कोपर स्टेशन जवळ क्रॉसिंग करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागला.

कोपर स्टेशन जवळ क्रॉसिंग करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागला.

कोपर स्टेशन जवळ क्रॉसिंग करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागला.

डोंबिवली, 3 फेब्रुवारी : रेल्वेचा रूळ ओलांडताना समोर आलेल्या लोकलची धडक बसून 3 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कोपर स्टेशन जवळ क्रॉसिंग करताना 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. कोपर रेल्वे स्थानकापासून जवळच काही जण क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी समोरून आलेल्या लोकलच्या 4 जणांना जोरदार धडक बसली. यामध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे. धडक बसलेल्या चौघांपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका जणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नयेत, असं आवाहन रेल्वेकडून वारंवार केलं जातं. असं असतानाही अनेकजण जीव धोक्यात घालून वेळ वाचवण्यासाठी असा प्रकार करतात. त्यातूनच मग अशा दुर्घटना समोर येत असल्याचं बोललं जात आहे. VIDEO : 'एअर इंडिया'ने प्रवाशांना जेवणात दिलं चक्क झुरळ
First published:

Tags: Railway accident

पुढील बातम्या