पोटदुखीच्या त्रासामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

पोटदुखीच्या त्रासामुळे रेल्वेमंत्री पीयूष गोयल ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज संध्याकाळी ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास सीएसएमटी येथील रेल्वेच्या कार्यलयात सुरू असलेल्या बैठकीत गोयल यांना अचानकपणे पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आलंय. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

  • Share this:

27 नोव्हेंबर, मुंबई : मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज संध्याकाळी ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास सीएसएमटी येथील रेल्वेच्या कार्यलयात सुरू असलेल्या बैठकीत गोयल यांना अचानकपणे पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आलंय. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल एलफिन्स्टन पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आलेत. एलफिन्स्टन पुलाच्या कामाच्या पाहणीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार होते. संध्याकाळी 6.30 वाजता ही पत्रकार परिषद नियोजित होती. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एलफिन्स्टन पुलाच्या कामाच्या पाहणी दौ-यानंतर गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यानच त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना बैठक अर्ध्यावरच सोडून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोयल यांना बोलतानाही काहीसा त्रास होत असतानाच अचानक ही पोटदुखी उफाळून आली. त्यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

First published: November 27, 2017, 10:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading