रेल्वे अपघातांमुळे सुरेश प्रभू व्यथित, पण पंतप्रधानांनी राजीनामा फेटाळला

रेल्वे अपघातांमुळे सुरेश प्रभू व्यथित, पण पंतप्रधानांनी राजीनामा फेटाळला

लागोपाठच्या दोन मोठ्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी पंतप्रधानांकडे जाऊन राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. पण पंतप्रधानांनी त्यांनी घाई करू नका, वाट बघा, असा सल्ला दिल्याचं स्वतः प्रभूंनीच ट्विटरवरून जाहीर केलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : लागोपाठच्या दोन मोठ्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी पंतप्रधानांकडे जाऊन राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. पण पंतप्रधानांनी त्यांनी घाई करू नका, वाट बघा, असा सल्ला दिल्याचं स्वतः प्रभूंनीच ट्विटरवरून जाहीर केलंय.

वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातांनी मी व्यथित झालोय, गेली तीन वर्षे रेल्वेत सुधारणा व्हावी, यासाठी मी रक्त आटवलंय, असंही रेल्वेमंत्री प्रभू यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटलंय.

गेल्या आठवड्यात मुझफ्फरनगरमध्ये उत्कल एक्स्प्रेसला तर आज ओरय्या इथे कैफियत एक्स्प्रेसला मोठा अपघात झालाय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचं अपयश पुन्हा चव्हाट्यावर आलंय. याचीच जबाबदारी म्हणून रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांनी आज राजीनामा दिलाय. त्यानंतर लगेच रेल्वेमंत्र्यांनीही राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण पंतप्रधानांनीच त्यांना थांबवण्याचा सल्ला दिलाय.

First published: August 23, 2017, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading