काँग्रेस आमदाराचं एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, शिवीगाळ केल्याचा आरोप

काँग्रेसच्या आमदारानं 'एअर इंडिया'च्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 01:47 PM IST

काँग्रेस आमदाराचं एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, शिवीगाळ केल्याचा आरोप

रायपूर, 11 सप्टेंबर : काँग्रेसच्या आमदारानं 'एअर इंडिया'च्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आरोप छत्तीसगडचे काँग्रेसचे आमदार विनोद चंद्राकर यांच्यावर 'एअर इंडिया'च्या महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा  करण्यात आला आहे. एअर इंडियानं दिलेल्या माहितीनुसार,'काँग्रेस आमदार चंद्राकर 7 सप्टेंबर रोजी आपल्या पाच साथीदारांसोबत रायपूरहून रांचीच्या दिशेनं प्रवास करत होते. या विमान प्रवासासाठी विमानतळावर पोहोचण्यास त्यांना तब्बल एक तास उशीर झाला. महिला कर्मचाऱ्यानं ही बाब निर्दशनास आणून दिल्यामुळे आमदार चंद्राकर तिच्यावरच भडकले. रागाच्या भरात त्यांनी महिला कर्मचाऱ्याला सर्वांदेखत शिवीगाळदेखील केली.

(वाचा :धक्कादायक! 81 वर्षांच्या म्हाताऱ्याचा वेष घेऊन तरुण परदेशात काढणार होता पळ, पण..)

याबाबत एअर इंडियानं सांगितलं की, 'आमदार चंद्राकर बोर्डिंग वेळेच्या एक तासानंतर विमानतळावर पोहोचले. यावेळेस रायपूर विमानतळावरील एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यानं विमानानं उड्डाण भरल्याची माहिती त्यांना दिली. हे ऐकून या आमदाराचं स्वतःवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यानं CISFच्या जवानांना हस्तेक्षप करावा लागला. या घटनेतून CISFच्या जवानांनी संबंधित महिलेला वाचवलं'.

(वाचा :जम्मू काश्मीर : 'लष्कर-ए-तोयबा'तील टॉपच्या दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा)

एयर इंडियाने आमदाराला ठरवलं दोषी

Loading...

या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान आमदार चंद्राकर यांना एअर इंडियानं दोषी ठरवलं आहे. शिवाय, या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. संपूर्ण चौकशीचा अंतिम अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

(वाचा :भाजपनंतर MIM कडून राष्ट्रवादीला शह, नेत्याला पक्षात घेत उमेदवारीही केली जाहीर)

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 01:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...