S M L

ट्रकच्या धडकेत शिवसेना शाखाप्रमुखाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2018 11:29 PM IST

ट्रकच्या धडकेत शिवसेना शाखाप्रमुखाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

मोहन जाधव, रायगड, 01 सप्टेंबर : मुंबई गोवा महामार्गावर रेपोली फाटा इथं मागून येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना ट्रकच्या मागील बाजूस लागून टायरखाली आल्याने मोटारसायकल स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सोबत प्रवास करणारी त्यांची लहान मुलगी ही गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये.

            प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, माणगांव तालुक्यातील रेपोली फाटा येथे कविलवहाळ येथील शिवसेना शाखाप्रमुख दिपक निमण हे आपली मुलगी उज्वला दिपक निमण (9) हिला घेऊन आपल्या ताब्यातील स्कुटी क्रमांक एम.एच. 06, बी.एल. 2876 ने माणगांववरून लोणेरेकडे जात असतांना मागून आलेल्या ट्रक क्रमांक एम.एच 04, जी.सी. 7677 ने त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी समोरून आलेल्या वाहनाला साईड देताना ट्रकची मागील बाजू दिपक निमण यांना लागली. रस्त्याचे काम सुरू असल्याने साईडपट्टीला जागा नसल्याने त्यांना ट्रकचा धक्का लागून ते थेट मागील टायरखाली आले आणि मुलगी बाजूला फेकली गेली. हा अपघात एवढा भीषण होता की, मयत दिपक निमण यांच्या डोक्यावरून टायर गेल्याने डोके फुटून मेंदूच बाहेर आला होता तर मुलगी गंभीर जखमी होऊन बाजूला पडली होती.गोरेगांव पोलीस ठाण्याला अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार पांडुरंग सानप, अक्षय जाधव आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले. तर जखमी उज्वलाला माणगांव उपजिल्हारुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठवून दिले.

उज्वला ही गंभीर जखमी असल्याने तिच्यावर प्रथमोपचार करून तिला तातडीने मुंबई येते पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात आले आहे. गोरेगांव पोली सठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

            दरम्यान, दिपक निमण हे शिवसेनेचे कविलवहाळ लोकप्रिय शाखाप्रमुख होते. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच माणगांव पंचायत समिती सभापती राजेश पानवकर, तालुकाप्रमुख अनिल नवगणे, रा.जि.प. सदस्या अमृता हरवंडकर, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे आदींनी दवाखान्यात धाव घेत कुटुबियांचं सात्वन केलं.

Loading...
Loading...

===============================================

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2018 11:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close