मुंबई, 16 ऑगस्ट : कोरोनाच्या धोका वाढत असल्यामुळे मुंबईत अजूनही लॉकडाऊन आहे. अशात मुंबईत लॉकडाऊनचे सगळे नियम पायदळी तुडवत हुक्का पार्लर सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रविवारी पहाटे मुंबई पोलिसांनी एका रेस्टॉरंटमधून कोविड -19 नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आणि अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली 28 महिलांसह 97 जणांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या महिलांना काही वेळाने सोडून देण्यात आलं असून रेस्टॉरंटच्या तीन कर्मचाऱ्यांसोबत इतर लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जोगेश्वरीतील लिंक रोडवरील बॉम्बे ब्रूट रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला. यावेळी मद्यपान, नृत्य आणि हुक्का पिणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यात मानाच्या 5 गणपतींसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेश भक्तांमध्ये आनंद
अटक केलेली सर्व लोकं ही शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रेस्टॉरंट मॅनेजरने या लोकांशी संपर्क साधला आणि निर्बंध शिथिल झाल्यानंतर रेस्टॉरंट पुन्हा सुरु झालं आहे अशी माहिती दिल्याने मद्यपी रेस्टॉरंटमध्ये गेले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मुंबईकरांनो Weather Alert नक्की वाचा, येत्या बुधवारपर्यंत अशी आहे पावसाची स्थिती
ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितलं की, एकूण 97 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील 28 महिलांना सोडण्यात आलं आहे तर इतरांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता आणि साथीच्या कायद्यातील तरतुदींखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.