शशी थरूर यांना मागे टाकत राहुल गांधींची ट्विटरवर आघाडी!

शशी थरूर यांना मागे टाकत राहुल गांधींची ट्विटरवर आघाडी!

शशी थरूर हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे काँग्रेसचे नेते आहेत. आता ही जागा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलीय. राहुल गांधी यांचे ट्विटरवर 67 लाख 7 हजार फॉलोअर्स झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 एप्रिल : शशी थरूर हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे काँग्रेसचे नेते आहेत. आता ही जागा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलीय. राहुल गांधी यांचे ट्विटरवर 67 लाख 7 हजार फॉलोअर्स असून शशी थरूर यांच्या फॉलोअर्सची संख्या 67 लाख एवढी आहे.

गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी सोशल मीडियावर अतिशय सक्रिय आहेत. त्यांच्या ट्विट्सची भाषाही बदलली असून ती जास्त संवादी झाली आहे. या आधी राहुल गांधींचं ऑफिस ट्विट करायचं आता ट्विटर अकाऊंट त्यांच्या स्वत:हाच्या नावावर आहे.

त्याच बरोबर कविता,शेरो शायरी, उपहास,व्यंग यांचा वापरही अतिशय चपखलपणे ते करत असल्यानं ट्विटर फॉलोअर्सची संख्या वाढण्याची कारणं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत मात्र राहुल गांधी खूपच मागे असून मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 4 कोटी 23 लाख एवढी आहे.

First published: April 29, 2018, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading